Mumbai News – धारावीत रेल्वे फाटकाजवळ भीषण आग, माहिम-वांद्रे दरम्यान लोकल विस्कळीत

धारावीतील 60 फूट रोडवरील सेनापती बापट रोडजवळील माहिम रेल्वे फाटकाजवळील नवरंग कंपाउंडमध्ये भीषण आग लागल्याची घटना शनिवारी घडली. आगीमुळे माहिम आणि वांद्रे स्थानकादरम्यान लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही.
धारावीत रुळाजवळ आग लागल्याने गाड्या थांबवण्यात आल्या. यामुळे वांद्रे आणि माहिम दरम्यान लोकल विस्कळीत झाली आहे. रुळांजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आग पसरल्याने लोकल ट्रेन सेवा प्रभावित झाल्याचे पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
आगीची माहिती मिळताच दादर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिवाजी पार्क अग्निशमन केंद्रातून एमएफबीच्या चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलीस, 108 रुग्णवाहिका आणि बीएमसीच्या वॉर्ड कर्मचाऱ्यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कूलिंग ऑपरेशननंतर आग नेमकी कशामुळे लागली चौकशी केली जाईल.

Comments are closed.