अजित पवारांनी पोलिसांना खुर्च्या उचलायला लावल्या, अंबादास दानवे यांनी फटकारले

जालना येथे एका प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दम देत त्यांच्या उमेदवारांसाठी खुर्च्या लावायला सांगितल्या. त्यांच्या या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी त्यावरून अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
जनतेला गृहीत धरणारे अजित दादा आता पोलिसांनाही आपले कार्यकर्ते समजायला लागले आहेत. @AjitPawarSpeaks
निवडणूक तुमची..
सभा तुमची..
भाषण तुमचे..
उमेदवारही तुमचे..अन खुर्च्या पोलिसांना लावायला सांगायच्या.. ही पोलिसांची ड्युटी आहे का? सांगा@DGPMaharashtra @CMOMaharashtra… pic.twitter.com/bxosdNt6mq
— अंबादास दानवे (@iambadasdanve) 22 नोव्हेंबर 2025
”जनतेला गृहीत धरणारे अजित दादा आता पोलिसांनाही आपले कार्यकर्ते समजायला लागले आहेत. निवडणूक तुमची, सभा तुमची, भाषण तुमचे, उमेदवारही तुमचे, अन खुर्च्या पोलिसांना लावायला सांगायच्या… ही पोलिसांची ड्युटी आहे का? सांगा”, असा सवाल अंबादास दानवे यांनी अजित पवारांना केला.

Comments are closed.