दीड दिवसात कसोटी सामना संपला! पर्थची खेळपट्टी इंग्लंडसाठी ठरली कर्दनकाळ, ट्रॅव्हिस हेडची तुफानी


पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ८ विकेट्सवर पराभव केला. अ‍ॅशेस मालिकेतील पहिलीच कसोटीत पहिल्या सत्रापासून सुरू झालेला विकेट्स पडण्याचा सिलसिला थेट दीड दिवसात सामन्याचा शेवट करून गेला. पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवरील धोकादायक खेळपट्टीने इंग्लंडला अक्षरशः गुडघ्यावर आणलं आणि ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्सने धडाकेबाज विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांच्या एकूण 19 विकेट्स पडल्या आणि  दुसऱ्या दिवशीही हा कहर थांबला नाही. अर्ध्या दिवसाच्या खेळातच 11 विकेट्स पडल्या. इंग्लंडचा दुसरा डाव केवळ 164 धावांवर ऑलआऊट झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर 205 धावांचे लक्ष्य झाले. या खेळपट्टीच्या परिस्थिती पाहता अजिबात सोपे नव्हते, पण ट्रॅव्हिस हेडने फक्त 69 चेंडूत तुफानी शतक ठोकून सामना ऑस्ट्रेलियाच्या खिशात टाकला.

आणखी वाचा

Comments are closed.