टी-20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेबाबत 5 मोठ्या अपडेट्स समोर! एक महिना अगोदर प्रत्येक संघाला घ्यावा लागणार हा मोठा निर्णय

टी-20 विश्वचषक 2026 (T20 World Cup 2026) स्पर्धेची यजमानी भारत आणि श्रीलंका (India & Shrilanka) संयुक्तपणे करणार आहेत. या वेळीही स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून सर्व 20 संघांची नावे निश्चित झाली आहेत.

वर्ल्ड कप सुरू होण्याच्या सुमारे एक महिना आधी प्रत्येक देशाला अंतिम संघ आयसीसीकडे जमा करावा लागतो. संघात 15 खेळाडू ठेवण्याचीच परवानगी असेल.

वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघाची संभाव्य टीम पाहिली तर ती आशिया कप 2025 मध्ये खेळलेल्या संघासारखीच राहण्याची शक्यता आहे.

सध्या आयसीसीने वर्ल्ड कपचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेले नाही. मात्र 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता मुंबईमध्ये वेळापत्रकाची घोषणा होणार आहे.

टी-20 विश्वचषक 2026 मध्ये सहभागी होणारे सर्व 20 संघ: भारत, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडिज, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, कॅनडा, इटली, नेदरलँड्स, नामिबिया, झिम्बाब्वे, ओमान, नेपाळ आणि यूएई.

Comments are closed.