वनडे मालिकेतून गिल दुखापतीमुळे बाहेर होणार? गिलच्या गैरहजेरीत कर्णधारपदासाठी तीन पर्याय समोर!
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. कसोटीनंतर वनडे मालिका होणार आहे. 3 सामन्यांच्या या वनडे मालिकेत शुबमन गिल (Shubman gill) बाहेर जाऊ शकतो, कारण तो अजून पूर्ण फिट झालेला नाही. त्याच्या मानेला दुखापत आहे, त्यामुळे तो दुसरा कसोटी सामना खेळत नाही. अशा परिस्थितीत गिल वनडे मालिकेत खेळणार नाही, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्याच्या जागी कर्णधार कोण होणार, यासाठी 3 नावं पुढे आली आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दुर्दैवाने, गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 वनडे सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नाही. तज्ज्ञांनी त्याला आणखी विश्रांती घ्यायला सांगितली आहे आणि बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.
टाइम्स ऑफ इंडिया च्या रिपोर्टनुसार, शुबमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळू शकणार नाही. मात्र तो 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत पुनरागमन करू शकतो. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या 3 वनडे सामन्यांसाठी कर्णधारपदाच्या शर्यतीत अक्षर पटेल (Axar Patel) आणि ऋषभ पंत (Rishbh Pant) ही दोन प्रमुख नावं समोर आली आहेत. गुवाहाटी कसोटीमध्येही शुबमन गिलऐवजी ऋषभ पंतने नेतृत्व केलं आहे. सध्या तरी वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेने वनडे आणि टी-20 मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे.
कोलकात्यात खेळलेल्या पहिल्या कसोटीमध्ये गिल फलंदाजीला आला तेव्हा त्याच्या मानेला तीव्र वेदना जाणवल्या. त्यामुळे तो 3 चेंडू खेळल्यानंतर लगेच रिटायर्ड हर्ट झाला. दुसऱ्या डावातही तो फलंदाजीला उतरू शकला नाही. त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं आणि तो अद्याप पूर्ण बरा झालेला नाही.
Comments are closed.