पुनरागमन करावं तर ऋषभ पंत सारखं! वनडेत पुनरागमन होताच कर्णधार बनण्याची शक्यता, दक्षिण आफ्रिका ODI मालिकेबाबत मोठी अपडेट समोर
भारतीय क्रिकेट संघाचा युवा कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) सध्या दुखापतीमुळे बाहेर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुवाहाटीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये तो टीम इंडियाचा भाग नाही. त्याच्या जागी ऋषभ पंत (Rishbh Pant) दुसऱ्या कसोटीमध्ये कर्णधारपद सांभाळत आहे. आता अशी चर्चा समोर आली आहे की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतही पंतला टीम इंडियाचे नेतृत्व दिले जाऊ शकते.
ऋषभ पंत (Rishbh Pant) ऑगस्ट 2024 पासून वनडे टीमपासून बाहेर होता. परंतु आता फक्त त्याचे पुनरागमनच नाही, तर त्याला वनडेत कर्णधारपद दिले जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. द वीकच्या रिपोर्टनुसार, भारतीय संघ व्यवस्थापन शुबमन गिलला घाईघाईत परत आणू इच्छित नाही.
गिलला मानेला दुखापत झाली असून तो कोलकात्यात झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात जखमी झाला होता.
पंतने शेवटचा वनडे सामना ऑगस्ट 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला 50 षटके आणि टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून बाहेर ठेवण्यात आले असून केएल राहुलला (KL Rahul) वनडेतील पहिली पसंतीचा विकेटकीपर-फलंदाज करण्यात आले आहे. याआधी आलेल्या एका रिपोर्टमध्ये असेही सांगितले होते की, गिल आणि अय्यर नसतील तर केएल राहुललाही कर्णधारपद दिले जाऊ शकते.
श्रेयस अय्यरला (Shreyas iyer) वनडे संघाचा उपकर्णधार नेमण्यात आले होते. त्यामुळे गिल नसल्यास अय्यरकडेच कर्णधारपद गेले असते, पण तो देखील दुखापतीमुळे बाहेर आहे. अय्यर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका खेळू शकत नाही, त्यामुळेच पंतला कर्णधारपद दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. या मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल यांसारखे वरिष्ठ खेळाडूही उपलब्ध असतील.
भारत–दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेचे वेळापत्रक
पहिला वनडे – 30 नोव्हेंबर – रांची
दुसरा वनडे – 3 डिसेंबर – रायपूर
तिसरा वनडे – 6 डिसेंबर – विशाखापट्टणम
Comments are closed.