फिनिश विद्यापीठ भारतात येणार

नवी दिल्ली  :

अनेक विदेशी विद्यापीठांनी भारतात आपल्या शाखा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधील प्रसिद्ध विद्यापीठांनी यासाठी सज्ज होण्यास प्रारंभ केला असून, त्यांच्या योजना कार्यान्वित होत असतानाच, फिनलंड या युरोपातील देशानेही भारतात आपल्या विद्यापीठांच्या शाखा काढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. फिनलंड हा देश त्याच्या वैशिष्ट्यापूर्ण शिक्षण पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना आता भारतातच या उच्च गुणवत्तेच्या शिक्षण पद्धतीचा लाभ मिळणार असून त्यासाठी आता परदेशी जाण्याची आवश्यकता राहणार नाही, अशी स्थिती आहे. काही देशांच्या विद्यापीठांनी यापूर्वीच भारतात आपल्या शाखांचा प्रारंभ केला असून शिक्षण देण्याची प्रक्रियाही हाती घेतली आहे. भारत सरकार आणि फिनलंड यांच्यात यासंबंधी एक करारही करण्यात आला आहे, अशी माहिती फिनलंड सरकारच्या प्रवक्त्याने दिली आहे. हे विद्यापीठ भारतात कोठे आपल्या शाखा स्थापन करणार याची माहिती मात्र, नंतर देण्यात येणार आहे.

Comments are closed.