घर पे खेल रहे हो क्या; अंपायरची वॉर्निंग, ऋषभ पंतचा पारा चढला, कुलदीपला नको नको ते बोलला, Video
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुसरी कसोटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर रंगला आहे. पहिल्या दिवशी दोन्ही संघांनी जोरदार टक्कर दिल्यानंतर दुसऱ्या दिवसाची सुरुवातही तितकीच रोमहर्षक झाली. पण खेळ सुरू होताच मैदानावर एक छोटा ड्रामा पाहायला मिळाला आणि तोच चर्चेचा विषय ठरला.
87व्या षटकात अंपायरची वॉर्निंग आणि पंतचा संताप
87वे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव धावत आला. त्याआधी तो गोलंदाजीचा सराव करत होता. पण त्या सरावाचा वेळ दोन मिनिटांच्या मर्यादेपेक्षा जास्त गेला. मैदानावर टायमर सतत चालू असतो आणि तो मर्यादा ओलांडताच अंपायरने भारतीय कर्णधार ऋषभ पंतला ‘टाईम वॉर्निंग’ दिली. ही वॉर्निंग मिळताच ऋषभ पंतचा पारा चढला. कर्णधार म्हणून त्याच्यावर वेळेची जबाबदारी असताना कुलदीपच्या दुर्लक्षामुळे त्याला चेतावणी मिळाली होती.
ऋषभ पंत स्टंपच्या मागे खूप मनोरंजक आहे 😂❤️ pic.twitter.com/JPzEUolKMl
— अंकुर (@cricwithpant2) 23 नोव्हेंबर 2025
“30 सेकंदाचा वेळ आहे… घर पे खेल रहे हो क्या?” – ऋषभ पंत
अंपायरची वॉर्निंग मिळाल्यानंतर ऋषभ पंत थेट कुलदीपकडे वळला आणि संताप व्यक्त करत म्हणाला की, “30 सेकंदाचा वेळ आहे… घर पे खेल रहे हो क्या? स्क्रीनवर टायमर चालू आहे दिसत नाही का?” पंतच्या या रागीट प्रतिक्रियेमुळे मैदानावरचा तो क्षण लगेचच चर्चेत आला. सोशल मीडियावर यांच्या व्हायरल व्हिडिओ होत आहे.
ऋषभ पंतला कुलदीप: टायमर चालू आहे, घाई करा, तू घरी खेळत आहेस का?
नंतर अंपायरने दुसऱ्यांदा इशारा दिला 💔 pic.twitter.com/CUep5Rrse2
— 𝐻𝟣𝟩 (@rishabhhive) 23 नोव्हेंबर 2025
ICC चा ‘स्टॉप क्लॉक’ नियम म्हणजे नक्की काय?
कसोटी क्रिकेटमध्ये एखादा ओव्हर संपल्यानंतर पुढचा ओव्हर 60 सेकंदांच्या आत सुरू करणे अनिवार्य आहे. जर या वेळेपेक्षा उशीर झाला, तर अंपायरकडून पहिली चेतावणी दिली जाते. अशी दोन चेतावणी मिळाल्यानंतर पुन्हा एकदा वेळेचे उल्लंघन झाले, तर प्रतिस्पर्धी संघाला थेट 5 धावा पेनल्टी म्हणून दिल्या जातात. महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येक 80 ओव्हरनंतर हा नियम रीसेट होतो. म्हणजे 80 ओव्हरांपूर्वी दोन चेतावणी मिळाल्यात तरी नवीन चेंडू घेतल्यावर पुन्हा स्टॉप क्लॉक नव्याने सुरू होते.
सामन्याच्या पहिल्या दिवशी काय काय घडलं?
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एडन मार्कराम आणि रायन रिकेलटन यांनी पहिल्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. बुमराहने पहिल्या सत्राच्या समाप्तीपूर्वी मार्करामला गोलंदाजी करून ही भागीदारी मोडली. त्यानंतर कुलदीप यादवची फिरकी कामी आली आणि संघाने पुनरागमनाचा प्रयत्न केला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 6 बाद 247 धावा केल्या होत्या. सेनुरन मुथुस्वामी 25 धावा आणि काइल व्हेरेन 1 धावा घेऊन खेळत होते. आता दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज दक्षिण आफ्रिकेचा डाव लवकर गुंडाळण्यावर लक्ष केंद्रित करतील.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.