शिवसेनेपुढे कोणतीही दहशत चालत नाही, उलट आमचीच दहशत, पण..; मंत्री शंभूराज देसाई थेटच बोलले


Shambhuraj Desai  फलटण : शिवसेनेपुढे कोणतीही दहशत चालत नाही, उलट आमचीच दहशत आहे. फक्त मंत्री झाल्यापासून शिंदे साहेबांनी शांततेने घ्यायला सांगितले आहे. पण यालाहे काहीतरी संयम असतो. असे म्हणत मंत्री शंभूराज देसाईंना (Shambhuraj Desai) मित्र पक्षांना सूचक इशारा दिल्याचे बोललं जात आहे. भाजपकडून शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची फोडाफोडी सुरु असल्याच्या कारणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच दिल्लीत भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांविषयी अमित शाह यांच्याकडे नाराजीचा सूर लावल्याची चर्चा होती. त्यानंतर आता पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनीही सूचक इशारा देत यावर भाष्य केलंहे.

Shambhuraj Desai : शिवसेनेचा पालकमंत्री म्हणून सांगतो, त्याला सोडणार नाही

फलटण येथील घटना ही दुर्दैवी आहे. याची सध्या चौकशी सुरू असून या प्रकरणी SIT नेमलेली आहे. सरकारने याकडे कडक भूमिका घ्यायचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचा पालकमंत्री म्हणून सांगतो, या प्रकरणात ज्या व्यक्तींचा संबंध आहे त्या व्यक्तीला गोवल्याशिवाय पकडल्याशिवाय ही शिवसेना शांत बसणार नाही. मयत डॉक्टरला ज्यानं हे कृत्य करायला भाग पाडलं त्याला सोडणार नाही. असा गंभीर इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. आचारसंहिता चालू आहे मात्र. ही आचारसंहिता संपल्यानंतर मी शब्द देतो या डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील प्रत्येक दोषीवर कडक कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशाराहे यावेळी शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

Shambhuraj Desai : लोक मंत्रिपद मिळण्यासाठी पक्ष बदलतात, मात्र आम्ही असणारी मंत्री पद सोडली, कारण…

आम्ही मंत्री पद असताना देखील शिंदे साहेबांच्या सोबत गुवाहाटीला गेलो होतो. लोक मंत्रिपद मिळण्यासाठी पक्ष बदलतात, मात्र असणारी मंत्री पद आम्ही सोडली. कारण जीवाला जीव देणारे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. 28 नोव्हेंबरला फलटणमध्ये एकनाथ शिंदे येणार आहेत. यावेळी फलटणकारांनी अनिकेतराजे माध्यमातून पुढील पाच वर्षासाठी काय रोड मॅप प्लॅनिंग करायचं ते करूया. असेही मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.

आणखी वाचा

मराठी : देवेंद्र फणडवीस कार्यक्रमात दोन खुर्च्यांचं अंतर ठेवून बसले; दुराव्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

आणखी वाचा

Comments are closed.