हिंदुस्थानच्या महिला दृष्टीहीन संघाने जिंकला टी-20 वर्ल्डकप, फायनलमध्ये नेपाळचा केला पराभव

हिंदुस्थानच्या महिला दृष्टीहीन महिला संघाने अंतिम लढतीत नेपाळचा पराभव करत पहिल्या टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले. कोलंबोमध्ये झालेल्या अंतिम लढतीत हिंदुस्थानने नेपाळचा 7 विकेट्सने पराभव करत जेतेपद पटकावले. हिंदुस्थानने एकही सामना न गमावता या विजेतेपदाला गवसणी घातली.
फायनलमध्ये हिंदुस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि नेपाळचा डाव 5 बाद 114 धावांमध्ये रोखला. त्यानंतर हे आव्हान अवघ्या 12 षटकांमध्ये पार करत विजेतेपद पटकावले. हिंदुस्थानच्या फुला सरेन हिने 27 चेंडूत 44 धावांची खेळी केली, तर सरिता घिमिरे हिने 38 चेंडूत 35 धावा फटकावल्या.

Comments are closed.