IND vs SA: घरच्या मैदानावर खेळताना दुसऱ्या कसोटीमध्ये ऋषभ पंतचा पारा चढला! सर्वांसमोरच कुलदीप यादवला सुनावलं

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) दुसऱ्या कसोटीमध्ये ऋषभ पंत (Rishbh Pant) टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळत आहे. पंत मैदानावर नेहमी मजेशीर मूडमध्ये दिसतो, परंतु क्वचितच त्याला राग येताना पाहायला मिळतं. मात्र, गुवाहाटी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी तो कुलदीप यादववर (Kuldeep yadav) भडकलेला दिसला. कारण, कुलदीप षटकं सुरू करण्यात उशीर करत होता. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावा केल्या. सेनुरन मुथुस्वामीने 109 आणि मार्को जानसेनने 93 धावा केल्या.

दुसऱ्या दिवशीच्या खेळादरम्यान ऋषभ पंतचे शब्द स्टम्प माईकमध्ये स्पष्ट ऐकू आले. कुलदीपवर राग व्यक्त करताना पंत म्हणाला, अरे यार, 30 सेकंदांचा टाइमर आहे. घरात खेळतोयस का? एक बॉल टाक पटकन. दोनदा वॉर्निंग झालीये तुला. पूर्ण एक ओव्हर लागतोय का तुला? कसोटी क्रिकेटची चेष्ठा लावलीयेस. फील्डिंग मला करू दे, तू फक्त टप्प्यावर लक्ष दे. बाकी काम होईल. काल पूर्ण दिवस मेहनत केली आहे, आता सोडणार नाही.

पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची छान सुरुवात झाली होती. पहिल्या दोन सेशनमध्ये त्यांनी फक्त दोन विकेट गमावल्या. पण तिसऱ्या सेशनमध्ये टीम इंडियाने जोरदार पुनरागमन करून 246 धावांवर त्यांचे 6 विकेट घेतले. मात्र, शेवटच्या 4 विकेट्सनी एकत्रित 243 धावा करत दक्षिण आफ्रिकेला 489 धावांपर्यंत पोहोचवलं.
मुथुस्वामीने 109 आणि जानसेनने 93 धावा केल्या. विशेष म्हणजे, गुवाहाटीच्या बारासपारा मैदानावर खेळला जाणारा हा पहिलाच कसोटी सामना आहे.

Comments are closed.