IND vs SA: 705 दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली! ऋतुराज गायकवाडचं वनडे मालिकेसाठी टीम इंडियात धडाकेबाज पुनरागमन

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 30 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाच्या 15 जणांच्या संघाची घोषणा केली आहे. शुबमन गिल (Shubhman gill) जखमी असल्यामुळे संघाबाहेर आहे आणि केएल राहुल (KL Rahul) वनडे टीमचं नेतृत्व करणार आहे. वनडे संघात ऋतुराज गायकवाडची (Ruturaj gaikwad) पुन्हा निवड झाली आहे. गेल्या काही काळात त्याने घरगुती क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती, त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवडण्यात आले आहे.

ऋतुराजने ऑक्टोबर 2022 मध्ये भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने 6 वनडे सामने खेळले, पण त्याची कामगिरी विशेष ठळक नव्हती. 19 डिसेंबर 2023 रोजी त्याने शेवटचा वनडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर तो संघाबाहेर होता.
अलीकडील दक्षिण आफ्रिका ‘A’ मालिकेत ऋतुराजने 3 सामन्यांत 210 धावा केल्या, ज्यात एक शतकही सामील होतं. या दमदार कामगिरीमुळे त्याची पुन्हा वनडे संघात निवड झाली आहे.

ऋतुराजचे वनडे रेकॉर्ड

समोर: 6

डाव: 6

धावा: 115

सरासरी: 19.16

सर्वाधिक धावसंख्या: 71

स्ट्राइक रेट: 73.24

अर्धशतक : १

शतक : ०

ऋषभ पंत आणि तिलक वर्मा (Rishbh Pant & Tilak Verma) हे देखील बराच काळ वनडे संघाचा भाग नव्हता, पण आता या दोघांनाही संघात स्थान देण्यात आलं आहे. शुबमन गिल, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पंड्या हे तिघेही जखमी असल्यामुळे या मालिकेत खेळणार नाहीत. त्यामुळेच पंत, तिलक आणि ऋतुराज यांना संधी मिळाली आहे. हे तिघेही चांगली कामगिरी करून टीम इंडियात स्वतःचं स्थान पक्कं करण्याचा प्रयत्न करतील.

Comments are closed.