IND vs SA: शमीकडे पुन्हा दुर्लक्ष! उत्कृष्ट फॉर्म असूनही ‘या’ खेळाडूंकडेही निवडकर्त्यांनी फिरवली पाठ
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे (South Africa vs India). संघाची कर्णधारपदाची धुरा केएल राहुलकडे (KL Rahul) सोपवण्यात आली असून अनेक स्टार खेळाडूंचं पुनरागमन झालं आहे. ऋषभ पंत (Rishbh Pant) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) पुन्हा वनडे संघात परतले आहेत, तर यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाडलाही (Ruturaj gaikwad & Yashsvi jaiswal) संधी देण्यात आली आहे.
काही असे खेळाडू आहेत ज्यांनी अलीकडे उत्कृष्ट कामगिरी केली असूनही निवड समितीचा विश्वास जिंकू शकले नाहीत.
मोहम्मद शमी
मोहम्मद शमीला (Mohmmed Shami) पुन्हा एकदा निवडकर्त्यांनी दुर्लक्षित केले आहे. अलीकडे त्याने रणजी ट्रॉफीत (Ranji trophy) दमदार कामगिरी केली होती. तरीदेखील शमीवर निवड समितीने विश्वास दाखवला नाही. शमीने आपला शेवटचा वनडे सामना 9 मार्चला चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळला होता.
अक्षर पटेल
प्रत्येक फॉरमॅटमध्ये भारतासाठी फलंदाजीत आणि गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अक्षर पटेललादेखील (Axar Patel) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवडण्यात आलेले नाही. अक्षरला दुर्लक्षित करण्याचा निर्णय अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरला आहे.
वरुण चक्रवर्ती
केवळ 4 वनडे सामन्यांत 10 विकेट्स घेणाऱ्या वरुण चक्रवर्तीला (Varun chakrawarthy) देखील 15 सदस्यीय संघात स्थान मिळालेले नाही. अलीकडे त्याने फिरकीच्या जोरावर प्रचंड प्रभावी गोलंदाजी केली आहे आणि अनेक फलंदाजांना गोंधळून टाकले आहे. भारतीय परिस्थितीत वरुण दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी मोठे आव्हान ठरू शकले असते.
मोहम्मद सिराज
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. मात्र बुमराह नसतानाही मोहम्मद सिराजला (Mohmmed Siraj) संघात संधी मिळालेली नाही. मिळालेल्या प्रत्येक संधीमध्ये सिराजने चांगली कामगिरी केली असली, तरी तो या मालिकेत खेळताना दिसणार नाही.
Comments are closed.