राजस्थान रॉयल्सचा मोठा निर्णय! जयपूरमध्ये होम मॅचेस होणार नाहीत? नवीन वेन्यूबाबत मोठी अपडेट समोर
IPL 2026पूर्वी राजस्थान रॉयल्सबाबत मोठी बातमी समोर आली आहे. फ्रँचायझी आपले होम ग्राउंड बदलण्याचा विचार करत आहे. पुढील आयपीएल हंगामामध्ये राजस्थानचे होम मॅचेस जयपूरमध्ये नाही, तर राज्याबाहेरच खेळवले जाणार आहेत. हे सामने जयपूरपासून सुमारे 1200 किमी दूर असलेल्या पुणे शहरात शिफ्ट होऊ शकतात.
क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, राजस्थान रॉयल्स आपले होम मॅच पुण्यात हलवण्याचा विचार करत आहे. मात्र, अजून काहीही अंतिम नाही. वेन्यू बदलण्याचा अंतिम निर्णय BCCI घेणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) ने हे मॅचेस होस्ट करण्यासाठी तयारी दर्शवणे आवश्यक आहे.
रिपोर्टनुसार, राजस्थान रॉयल्सने (Rajasthan royals) नवीन बेस शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी पुण्यातील MCA स्टेडियमला आपले होम ग्राउंड बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राजस्थान रॉयल्स आणि MCA अधिकाऱ्यांमध्ये प्रारंभिक चर्चा देखील झाली आहे.
क्रिकबजने सांगितले की, फ्रँचायझीची एक ऑपरेशन्स टीम अलीकडेच पुण्याला भेट देऊन स्टेडियमची पाहणी, हॉटेल्स, एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी आणि इतर लॉजिस्टिक गोष्टी तपासून आली आहे.
रिपोर्टनुसार, राजस्थान रॉयल्स जयपूर सोडत असल्याचे एक कारण म्हणजे राजस्थान क्रिकेट असोसिएशन (RCA) सोबतचे तणावपूर्ण संबंध. मागील सिझनमध्ये RCA च्या एका अधिकाऱ्याने फ्रँचायझीवर मॅच फिक्सिंगचे आरोप केले होते. RR ने हे आरोप नाकारले होते आणि त्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती.
जर MCA स्टेडियम राजस्थान रॉयल्सचे होम ग्राउंड ठरले, तर ते पुढील सिझनमध्ये इथे 4 मॅचेस खेळतील आणि उर्वरित 3 सामने गुवाहाटीमध्ये होऊ शकतात. आयपीएलमध्ये प्रत्येक टीम आपल्या होम ग्राउंडवर 7 सामने खेळते.
MCA च्या एका अधिकाऱ्याने क्रिकबजला सांगितले,
“हो, ते स्टेडियमची क्षमता, पिचेस आणि शहरातील हॉटेल्सबद्दल माहिती घेण्यासाठी येथे आले होते. आमचे अध्यक्ष रोहित पवार आयपीएल पुन्हा पुण्यात यावे याबद्दल खूप उत्सुक आहेत आणि ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
MCA मध्ये शेवटचा IPL सामना 2022 मध्ये खेळला गेला होता, जेव्हा संपूर्ण सिझन महाराष्ट्रात झाला होता.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) देखील नवीन वेन्यू शोधत आहे. या वर्षी चिन्नास्वामी स्टेडियमवर IPL मॅचेस न होण्याची शक्यता आहे. कारण मागील वर्षी RCB च्या विजय मिरवणुकीत झालेल्या गोंधळात काही चाहत्यांचा मृत्यू झाला होता.
रिपोर्टनुसार, MCA आपल्या पर्यायांचा विचार करत आहे. अधिकाऱ्याने सांगितले, आरसीबीला खरोखरच स्वारस्य आहे, पण ते दुसऱ्या ठिकाणी खेळतील याची हमी नाही. हा निर्णय अनेक गोष्टींवर अवलंबून असेल.
रिपोर्टनुसार, राजस्थान रॉयल्सने MCA ला ई-मेलद्वारे प्रस्ताव पाठवला आहे. तसेच, अशीही शक्यता आहे की IPL जवळ आल्यावर कर्नाटक सरकार निर्णय बदलून चिन्नास्वामी स्टेडियमला पुन्हा मंजुरी देऊ शकते.
RCB ने MCA ला IPL ऑक्शनपर्यंत वेळ मागितला आहे. IPL 2026 चे ऑक्शन 16 डिसेंबर 2025 रोजी अबू धाबी येथे होणार आहे.
Comments are closed.