मंत्री बाबासाहेब पाटलांनी गद्दारी केली, त्यांना धडा शिकवणार, संभाजी पाटील निलंगेकरांचा हल्लाबोल
Sambhaji Patil Nilangekar on Babasaheb Patil : अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत (Ahmedpur Municipal Council ) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्यातील भाजपाचे सर्व आमदार एकत्रित येत असून, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांना राजकीयदृष्ट्या घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीत गद्दारी केली आहे. आता गद्दारांना क्षमा नाही असे वक्तव्य भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केलं आहे. ते भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.
नगरपालिकेत जागा वाटपासंदर्भात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपाची चर्चा झाली पण
नगरपालिकेत जागा वाटपासंदर्भात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची बैठक झाली चर्चा झाली जागा वाटपाचा विषय झाला होता. मात्र ऐनवेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत भाजपाला धोका दिला. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाची चांगली ताकद असतानाही भाजपाने एकत्रित निवडणूक लढवण्यासंदर्भात पुढाकार घेतला होता. मात्र ऐनवेळी सहकार मंत्र्यांनी भाजपाला धोका दिल्याचे संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) म्हणाले.
नगरपालिकाच नाही तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप स्वबळावरच लढणार
नगरपालिकाच नाही तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप स्वबळावरच लढणार यात कॉम्प्रमाईज होणार नाही. आपली ताकद दाखवून द्या गद्दारांना जागा दाखवा, असा थेट संदेश आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. जिल्ह्यातील संपूर्ण भाजप यामुळे ॲक्टिव मोडवर आली आहे. अहमदपूरच्या नगरपालिका निवडणुकीत आता चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.
गेल्या वेळेस अपक्ष नगरसेवकांना हाताशी धरण भाजपने सत्ता खेचून आणली होती
गेल्या वेळेस अपक्ष नगरसेवकांना हाताशी धरण भाजपने सत्ता खेचून आणली होती. चार अपक्ष भारतीय जनता पक्षाचे सात राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ काँग्रेस आणि शिवसेनेचे दोन असं संख्या बळ होते. त्यामुळेच भाजपाने यावेळेस 25 पैकी दहा जागा आणि नगराध्यक्ष पद अशी मागणी केली होती. मात्र सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्वबळाचा नारा दिला. यामुळं भाजपाने आता नो कॉम्प्रोमाइज अशी भूमिका घेत सहकार मंत्र्यांना अहमदपूर मध्येच नव्हे तर जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या घेरण्याची व्युहरचना केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Yugendra Pawar : आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं; युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप
आणखी वाचा
Comments are closed.