शेअर बाजारातील ‘या’ स्टॉकवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता, कमाईची संधी
भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी सेन्सेक्स 400.76 अंकांच्या घसरणीसह 85231.92 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टीमध्ये 124 अंकांची घसरण होऊन तो 26068.15 अंकांवर तो बंद झाला. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांनी 36000 कोटी रुपयांची कमाई केली.

आता येत्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स बदल, जागतिक आर्थिक घडामोडींचा परिणाम म्हणून भारतीय शेअर बाजारात काही बदल पाहायला मिळू शकतात.

इंटरग्लोब एविएशनकडून इंडिगो या विमान वाहतूक कंपनीचं संचलन केलं जातं. बीएसईच्या टॉप 30 च्या सेन्सेक्स निर्देशांकात इंटरग्लोब एविएशनला स्थान दिलं जाईल. हे बदल 22 डिसेंबरपासून होणार आहेत. ज्याची घोषणा बीएसई इंडेक्स सर्व्हिसेसनं केली आहे.

टाटा मोटर्स या शेअरचं विभाजन झालं आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल कंपनीचा स्टॉक सेन्सेक्समधून बाहेर जाणार आहे. हे बदल 22 डिसेंबरला लागू होतील. कंपनीच्या शेअरध्ये 0.75 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. या कंपनीचा शेअर 362.50 रुपयांवर पोहोचला आहे.

ॲक्सिस बँक सीरिज-9 अंतर्गत 5000 कोटी रुपयांचे डिबेंचर्स जारी करणार आहे. याद्वारे बँकेचा 5000 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये 2000 कोटींची बेस साईज आणि 3000 कोटींचा ग्रीन शू ऑप्शन असेल.

अमेरिकेच्या एफडीएनं 10 नोव्हेंबर ते 21 नोव्हेबंर या कालावधीत लूपिनच्या गोवा उत्पादन सुविधेचं पाहणी केली. ही पाहणी From-483 सह पूर्ण झाली. कंपनीनं निर्धारित वेळेत समस्यांची पूर्तता करणार असल्याचं म्हटलंय.

एनटीपीसी ग्रीनची उपकंपनी अयाना रिन्यूएबल्स पॉवर प्रायवेट लिमिटेडला यश मिळालं आहे. आरईएमसी लिमिटेडकडून त्यांनी लिलावात 140 मेगावॅट नवीकरणीयक्षम प्रकल्पाचं कॉनट्रॅक्ट मिळवलं आहे.

आरव्हीएनल कंपनीनं नॉदर्न रेल्वेच्या 180.77 कोटी रुपयांच्या प्रकल्पात एल-1 बिडर झाल्याची माहिती दिली. हा प्रकल्प UTR-MWP सेक्शनला अपग्रेड करण्यासाठीचा आहे. लखनौ विभागातील हे काम 24 महिन्यात पूर्ण करायचं आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
येथे प्रकाशित : 23 नोव्हेंबर 2025 10:43 PM (IST)
व्यापार-उद्योग फोटो गॅलरी
आणखी पाहा
Comments are closed.