आन्वी सुवर्णाचा जन्मदिनी विक्रम

डोंबिवलीत राहत असलेल्या 10 वर्षांच्या आन्वी शैलेश सुवर्णा हिने वाढदिवशी समुद्रात 17 किमीपर्यंत पोहण्याचा विक्रम केला आहे. धाडस, सहनशक्ती आणि चिकाटीचा अद्भुत नमुना सादर करीत तिने अटल सेतू ते गेट वे ऑफ इंडियादरम्यानच्या खुल्या समुद्रात पोहण्याचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला.
आन्वीने स्वतःच्या दहाव्या वाढदिवशी हा विक्रम केला आहे. तिने पहाटे 2 वाजून 26 मिनिटांनी अटल सेतूपासून पोहण्याची सुरुवात केली आणि 5 वाजून 11 मिनिटांनी ती ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचली. खडतर समुद्री प्रवास तिने अवघ्या 2 तास 44 मिनिटांत पूर्ण करून सर्वांना आश्चर्यचकित केले. आन्वी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशिक्षक विलास माने आणि रवी नवाले यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर प्रशिक्षण घेत होती.

Comments are closed.