ठाकरेंच्या शिवसेनेला लातूर जिल्ह्यात मोठा धक्का; 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार


लातूर बातम्या : लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये (Renapur) शिवसेना (ठाकरे गटाला) मोठा धक्का बसला आहे. नगरपंचायत निवडणुकीत पक्षाचे 16 पैकी तब्बल 11 उमेदवार निवडणुकीतून माघार घेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केलीहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी पूर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र पक्षातीलच अडथळ्यांमुळे हा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

2016 मध्ये नगरपंचायतीची स्थापना झाली होती. 2017 निवडणुका झाल्या होत्या. पहिल्या निवडणुकीत भाजपाने एक हाती सत्ता मिळवली. तीन वर्ष प्रशासकाचा काळ होईल. फक्त आताच्या निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळते आहे. भाजप आणि शिवसेनेचे दोन्ही गट तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे मैदानात आहेत. मात्र शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अकरा लोकांनी माघार घेतल्याने निवडणुकीमध्ये आता वेगळीच चुरस पाहायला मिळते आहे.

माघार घेतलेले उमेदवार आणि प्रभाग :

ललिता बंजारा – नगराध्यक्ष

अनुसया कोल्हे – प्र. 03

महेश व्यवहारे – प्र. 05

गोविंद सुरवसे – प्र. 06

रेखा शिंदे – प्र. ०८

रेहानबी कुरेशी – प्र. 10

छाया आकांगिरे – प्र. ११

राजन हाके – प्र. 12

धोंडीराम चव्हाण – प्र. 13

शांताबाई चव्हाण – प्र. 14

बाबाराव ठावरे – प्र. 17

भाजपला आव्हान देण्यासाठी शिवसेनेला कमजोर केलंय?

लातूर ग्रामीणचे माजी आमदार काँग्रेस पक्षाचे नेते धीरज देशमुख यांनी भाजपला आव्हान देण्यासाठी शिवसेनेला कमजोर केलंय असे राजकीय क्षेत्रात बोललं जात आहे. शिवसेनेच्या 11 उमेदवारांना स्थानिक पातळीवर आपल्या बाजूने वळवण्यासाठी माघार घ्यायला लावणे ही खेळी काँग्रेसचीच आहे, असा विरोधक आरोप करतायेत. या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या निवडणूक रणधुमाळीत मोठे राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे. रेनापुरच्या चौरंगी लढतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या माघारीमुळे फायदा कोणाला तोटा कोणाला याची गणितं आता घातली जात आहेत.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गद्दारी केली; लातुरात युतीत बिघाड

अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्यातील भाजपाचे सर्व आमदार एकत्रित येत असून, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना राजकीयदृष्ट्या घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीत गद्दारी केली. आता गद्दारांना क्षमा नाही असे विधान भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. ते भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा

Comments are closed.