महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट 'ही' प्रमुख मागणी डिसेंबर महिन्यात मान्य होणार आहे

राज्य कर्मचारी बातम्या : महाराष्ट्र राज्य सरकारी सेवेत कार्यरत सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट येत आहे. खरं तर, राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक महागाई भत्त्याच्या वाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना नुकताच महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आला आहे. सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात तीन टक्के वाढीचा लाभ दिला आहे. या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्के झाला आहे.

मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अजूनही ५५ टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. दरम्यान, केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारही महागाई भत्त्यात (डीए) ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेणार आहे. पुढील महिन्यात अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

यामुळे राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा डीए ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के होणार आहे. विशेष म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे. केंद्र सरकारने जुलै 2025 पासून 3 टक्के महागाई भत्ता वाढ लागू केल्याने, राज्य कर्मचारीही दीर्घकाळ निर्णयाची वाट पाहत आहेत.

केंद्र सरकारच्या धर्तीवर विविध राज्यांतील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्के करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय धर्तीवर 58% पर्यंत वाढला आहे.

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात जुलै महिन्यातील महागाई भत्ता वाढ साधारणपणे डिसेंबर महिन्यात मंजूर केली जाते. मात्र, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असून आचारसंहिताही लागू असल्याने यंदा निर्णय लांबणीवर पडला आहे.

राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यावर बंधने येतात. त्यामुळे डीए वाढीचा प्रस्ताव सध्या रखडला आहे.

महापालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका संपल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. परंतु, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय विचाराधीन आहे.

या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय डिसेंबरअखेर जाहीर होण्याची चिन्हे आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे. अर्थात, राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही महागाई भत्त्याची थकबाकी दिली जाणार आहे.

परंतु डिसेंबरमध्ये राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्याची अधिकृत माहिती सरकारने अद्याप दिलेली नाही. त्यामुळे येत्या महिनाभरात असा काही निर्णय होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments are closed.