चीनमध्ये लोळण्याची अनोखी स्पर्धा

चीनमध्ये बेड बनवणाऱ्या एका कंपनीने आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली होती. बेडवर जास्तीत जास्त वेळ झोपणाऱ्या स्पर्धकाला विजेता घोषित करण्यात आले. या स्पर्धेत 240 लोकांनी भाग घेतला मात्र 23 वर्षीय तरुणाने तब्बल 33 तास 35 मिनिटांपर्यंत गादीवर झोपून राहण्याचा विक्रम केल़ा त्या युवकाला 3 हजार युवान म्हणजेच 37 हजार रुपये पारितोषिक देण्यात आले
बेड बनवणाऱ्या कंपनीने कॅम्पेन राबवले होते. ‘तांग पिंग’ म्हणजेच पडून राहणे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 240 लोकांनी सहभाग घेतलेल्या स्पर्धेपैकी 186 लोकांनी स्पर्धा धूम्रपानासाठी सोडली. शेवटपर्यंत काही जणच स्पर्धेत टिकून राहिले. 33 तास 9 मिनिटे झाल्यानंतर आयोजकांनी काठिण्य पातळी वाढवली. शेवटी उरलेल्या तीन लोकांना एकसाथ आपले हात आणि पाय उठवण्यास सांगितले. ज्या व्यक्तीने बराच काळ असे केले त्याला विजयी घोषित करण्यात आले. 23 वर्षांच्या विजयी तरुणाने सांगितले की, त्याला या स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्याच्या गर्लफ्रेंडने प्रेरित केले. स्पर्धेदरम्यान त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला. मात्र गर्लफ्रेंडने प्रोत्साहित केल्यामुळे मागे हटलो नाही.

Comments are closed.