Hasan Mushrif : वॉर्डात कमी मतदान झालं तर खैर नाही, मतदारांना जेव्हा तंबी मिळते Special Report
Hasan Mushrif : वॉर्डात कमी मतदान झालं तर खैर नाही, मतदारांना जेव्हा तंबी मिळते Special Report
स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगूल वाजलं… मात्र निवडणुकीत आपल्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाव्यात यासाठी राजकीय नेत्यांकडून धमकी देण्यात येतेय… कुणी मतदारांना तर कुणी उमेदवारांना धमकी देताना दिसतोय… विशेष म्हणजे ही धमकी थेट मंत्र्यांकडून मिळत असल्यानं त्याचं गांभीर्य वाढतंय… पाहुयात यावरील खास रिपोर्ट….
निवडणुकीत विजयासाठी रेवडी संस्कृती देशात रुजतेय… विधानसभा निवडणुकी आधी तर थेट खात्यात पैसे टाकून निवडणुका फिरवल्या जात असल्याची उदाहरणं आपण अलीकडे पाहिलेत.. आता हीच रेवडी संस्कृती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत रुजताना दिसतेय… स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तर थेट विरोधी उमेदवारांना निधी मिळणार नाही अशा इशारा जाहीर पणे देण्यात येतोय…येवढचं नाहीतर मतं दिलं नाहीतर विकास निधीवर काट मारण्यााच इशाराच उपमुख्यमंत्री अजित दादांनी दिलाय
आता उपमुख्यमंत्र्यांनीच मतदान न केल्यास निधी रोखण्याची धमकी दिल्यानंतर इतर नेते कसे मागे राहतील… ज्या वॉर्डात कमी मतदान होईल त्यांची खैर नाही असा सज्जड दमचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलमधील नेत्यांना भरला.
निवडणूक आहे, हो द्या खर्च असं म्हणत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तर खर्चाची चिंता करू नका असं विधान जाहीर सभेतून केलंय… येवढच नाहीतर निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ त्याची चिंता करू नका असा सल्लाही दिलाय. त्यांच्या या विधानाचा आता विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला
आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मतदानासाठी धमकी दिल्यानंतर तिकडे मंत्री जयकुमार गोरेंनी विरोधकांचा कार्यक्रम लावण्याची भाषा केली… अकलूज नगरपरिषदेत सत्ता मिळावी यासाठी त्यांनी विरोधकांना इशारा दिलाय.
नेते, मंत्री मतदानासाठी धमकी आणि इशारे देत असताना त्यावर राज्याच्या प्रमुखांना विचारलं असता त्यांनी मात्र नेत्यांच्या बोलण्याचा तसा अर्थ नसल्याचं सांगत हात झटकले…
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मंत्र्यांनी मतदारांना आणि उमेदवारांना धमकी देण्याची संस्कृती आता राज्यात रुजत चालल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय. त्यामुळे अशा भाषेला वेळीच लगाम लावण्याची नितांत गरज आहे. अन्यथा पुरोगामी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणखी लयाला जाण्यास वेळ लागणार नाही येवढं मात्र नक्की….
Comments are closed.