सोन्याच्या दरात 1448 रुपयांची घसरण,आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
नवी दिल्ली : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या वायदे बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. सोने आणि चांदीचे वायद्याचे दर घसरलेले पाहायला मिळाले. सोन्याचे वायद्याचे दर 123000 रुपये आणि चांदीचे दर 153000 रुपयांवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोने आणि चांदीच्या वायद्याचे दर घसरले आहेत. भारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर उच्चांक गाठल्यानंतर घसरत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Gold Rate : सोने दरात घसरण
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे डिसेंबरच्या वायद्याचे दर 1448 रुपयांनी घसरुन 122743 रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी सोन्याचा दर 124191 इतका होता. तस, सोन्याच्या वायद्याच्या दरानं या वर्षी 131699 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
चांदीच्या वायद्याच्या दरांची सुरुवात देखील घसरणीसह झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर डिसेंबरच्या वायद्याच्या चांदीचे दर 238 रुपयांच्या घसरणीसह 153913 रुपयांवर पोहोचले. चांदीचा यापूर्वीचा दर 154151 इतका होता. चांदीच्या वायद्यानं 169200 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात देखील चांदीच्या आणि सोन्याच्या वायद्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. कॉमेक्सवर सोनं 4069.20 डॉलर प्रति औंस होतं. त्यानंतर ते घसरुण 4044.40 डॉलर प्रति औंसवर आलं. सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात 4398 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते.
कॉमेक्सवर चांदीच्या वायद्याचे दर 49.85 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. चांदीचे दर 53.76 डॉलर प्रति औसपर्यंत पोहोचले होते. तिथून चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
सोन्याच्या दरातील घसरणीचं कारण?
अमेरिकेच्या फेड रिझर्व्हकडून व्याज दर कपातीची शक्यता कमी असल्यानं सोने दर घसरत आहेत. अमेरिकेमधील नोकरी बाजारातील नवे आकडे मजबूत आहेत. त्यामुळं डिसेंबरमध्ये अमेरिकेच्या फेड रिझर्व्हकडून व्याज दरात कपात केली जाण्याची शक्यता कमी आहे. डॉलर निर्देशांकानं देखील सहा महिन्याचा उच्चांक गाठला आहे. त्यामुलं सोने दरात घसरण सुरु आहे. भूराजनैतिक तणाव कमी झाल्यानं देखील सोन्यातील गुंतवणूकदार दुसऱ्या पर्यायांकडे वळत आहेत.
मुलगा खरेदी करत नाही का?
डॉलर मजबूत होणं, रशिया यूक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासंदर्भातील प्रस्तावाची चर्चा आणि अमेरिकेच्या फेड रिझर्व्हकडून व्याज दर कमी होण्याची शक्यता कमी होणं यासंदर्भातील अनिश्चिततेमुळं सोन्याच्या दरात तेजी आणि घसरण पाहायला मिळू शकते, असं मत जाणकारांनी नोंदवलं आहे. काही जाणकारांनी सध्या सोनं खरेदी करु नये असा सल्ला दिला आहे. मल्टी कमोडिटी एक्सेंजवर सोन्याचे दर 118000 रुपायंपर्यंत आल्यानंतर सोने खरेदीबाबत विचार करता येऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील दर ट्रेडिंग नुसार बदलत असतात.
आणखी वाचा
Comments are closed.