WTC फायनल खेळण्यासाठी टीम इंडिया फिट नाही, गौतम गंभीर आणि शुभमन गिलवर नाराज भारतीय सलामीवीर

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अंतिम सामना उद्या गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे. याआधीच्या कसोटी सामन्यात ३० धावांनी पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय संघ ०-१ ने मागे पडला आहे. आता भारतीय संघाला दुसरा कसोटी सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल, जेणेकरून टीम इंडिया 2025-27 च्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत कायम राहील.

मागच्या वेळी भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या फायनलच्या शर्यतीतून न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर ०-३ ने पराभूत झाला होता, त्यामुळे यावेळीही जर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेसमोर पराभवाला सामोरे जावे लागले तर भारताच्या अडचणी वाढतील.

रॉबिन उथप्पाने बीसीसीआयवर गंभीर आरोप केले

रॉबिन उथप्पाचे मत आहे की, भारतीय खेळाडू सतत क्रिकेट खेळून थकत आहेत. असे रॉबिन उथप्पाने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले

“विदेशी संघ भारतापेक्षा कमी क्रिकेट खेळतात आणि त्यांना तयारीसाठी जास्त वेळ मिळतो. भारतात खूप क्रिकेट घडत आहे. तुम्ही 'एकच आकार सर्वांसाठी फिट' असा विचार करून निकाल काढण्याचा प्रयत्न करत आहात (एकच फॉर्म्युला प्रत्येक फॉरमॅटमध्ये किंवा सर्वत्र लागू होतो). तुम्हाला पुढील दोन वर्षांच्या लक्ष्यांबाबत वास्तववादी असले पाहिजे.”

टीम इंडिया WTC फायनल खेळण्यास पात्र आहे का?

रॉबिन उथप्पाने डब्ल्यूटीसी फायनल खेळण्याच्या टीम इंडियाच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि टीम इंडियाने स्वत:ला विचारले पाहिजे की ते डब्ल्यूटीसी फायनल खेळण्यास पात्र आहेत का? रॉबिन उथप्पाने टीम इंडियाची सर्वात मोठी कमजोरी उघड केली आणि सांगितले

“हो, तुम्हाला डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचायचे आहे, पण हा संघ तिथे पोहोचण्यासाठी तयार आहे का? बुमराह आणि सिराज यांच्याशिवाय खरोखर प्रभावी कोण आहे? आमच्याकडे विश्वासार्ह तिसरा वेगवान गोलंदाज नाही. अनेक पर्याय आजमावले जात आहेत, पण सत्य हे आहे की तिसरा वेगवान गोलंदाज ठरलेला नाही.”

Comments are closed.