ना डीएडचा पत्ता ना बीएडचा पत्ता; बालवाडीच्या 24 शिक्षिकांवर सातवीपर्यंत शिकवण्याचे ओझे, भाईंदर पालिकेच्या प्रशासनाचा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

प्राथमिक किंवा माध्यमिक शाळांमध्ये शिकवण्यासाठी डीएड तसेच बीएडची पदवी असणे बंधनकारक आहे. मात्र भाईंदर महापालिकेने सर्व नियम धाब्यावर बसवत चक्क बालवाडीच्या २४ महिला शिक्षिकांवर सातवीपर्यंत शिकवण्याचे ओझे लादले आहे. मीरा-भाईंदर पालिका प्रशासनाचा हा कारभार म्हणजे हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार असून हा फतवा तत्काळ रद्द करावा, अशी मागणी पालकांनी केली आहे. तसेच बालवाडीच्या शिक्षिकांनीही या वाढीव कामाला कडाडून विरोध केला आहे.
मीरा, भाईंदर शहरात महापालिकेच्या ३६ शाळा असून यामध्ये ९ हजार ८७० गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच पालिकेच्या काही बालवाडीचे वर्गदेखील असून यावर २४ महिला शिक्षिका शिकवत आहेत. या शिक्षिका चार तास बालवाडीतील मुलांना शिकवून राहिलेल्या पुढील चार तासांत शासकीय, पालिकेच्या विविध मोहिमा व सर्वेक्षणाचे काम फत्ते करत असतात. मात्र आता या सर्व शिक्षिकांना पहिली ते सातवीपर्यंत शिकवण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसे पत्रच प्रशासनाने जारी केले आहे.
टीकेची झोड उठताच प्रशिक्षणाची तयारी
पालिकेच्या शिक्षण विभागात सुमारे दीडशे शिक्षक कार्यरत असून त्यांना ५० शासकीय अनुदान व ५० महापालिका वेतन अदा करते. मात्र या बालवाडीच्या शिक्षिकांकडे प्राथमिक शाळांमधील शिक्षिकाकडे, प्राथमिक शाळांमधील नसताना महापालिकेने त्यांच्यावर पहिली ते सातवीपर्यंत शिकवण्याची जबाबदारी लादली आहे. याविरोधात अनेकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर प्रशासनाने या सर्व शिक्षिकांना प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू केली आहे.
बालवाडी शिक्षिका पालिकेच्या आस्थापनेवर का बालवाडी शिक्षिका आस्थापनेवर विद्यार्थ्यांना शिकवण्यात त्यांची मदत व्हावी याकरिता बालवाडी शिक्षिकांना मोकळीक दिली आहे. या उद्देशाने हे आदेश दिले आहेत.
– दीपाली जोशी-पोवार शिक्षण अधिकारी, भाईंदर महापालिका

Comments are closed.