राहुलला कॅप्टन केलं पण वेगळ्याच पेचात टाकलं, रोहितसोबत ओपनिंगला कोण येणार? ऋतुराज की जैस्वाल…


Ruturaj Gaikwad or Yashasvi Jaiswal who should Open : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाकडून वनडे मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आले आहेत. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्यानं केएल राहुलला कॅप्टन करण्यात आलं आहे. दरम्यान, या मालिकेसाठी भारतीय संघाने दोन सलामीवीरांची निवड केली आहे ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल.

शुभमन गिल दुखापतीमुळे बाहेर झाल्याने या दोघांना संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे आता या दोघांमध्येच रोहित शर्माचा परफेक्ट सलामी जोडीदार ठरण्यासाठी चुरस रंगणार आहे. त्यामुळे त्यांची आकडेवारी पाहू….

एकदिवसीय कारकीर्द कशी राहिली आहे?

ऋतुराज गायकवाडने भारतीय संघासाठी सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्या सहा डावांमध्ये त्याने 19.16 च्या सरासरीने 115 धावा केल्या आहेत. त्याने एक अर्धशतक झळकावले आहे, ज्याचा सर्वोत्तम स्कोअर 71 आहे. यशस्वीने भारतासाठी फक्त एक एकदिवसीय सामना खेळला आहे, त्या सामन्यात त्याने 15 धावा केल्या आहेत. गायकवाडने अलीकडेच दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 117, 68* आणि 25 धावा केल्या आहेत.

गायकवाडची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी

गायकवाडने 89 लिस्ट अ सामने खेळले आहेत. 86 डावांमध्ये त्याने 57.39 च्या सरासरीने 4,534 धावा केल्या आहेत, सात वेळा नाबाद राहिला आहे. त्याने 17 शतके आणि 18 अर्धशतके केली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 220* आहे. गायकवाडने 43 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. 73 डावांमध्ये त्याने 45.59 च्या सरासरीने 3,146 धावा केल्या आहेत. त्याने नऊ शतके आणि 16 अर्धशतके केली आहेत.

यशस्वीच्या देशांतर्गत क्रिकेट आकडेवारीवर एक नजर

यशस्वीने 33 लिस्ट अ सामने खेळले आहेत. त्याने 33 डावांमध्ये 52.62 च्या सरासरीने 1,526 धावा केल्या आहेत. त्याने 5 शतके आणि 7 अर्धशतके केली आहेत. त्याचा सर्वोत्तम धावसंख्या 203 आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, त्याने 48 सामने खेळले आहेत आणि 89 डावांमध्ये 56.60 च्या सरासरीने 4,755 धावा केल्या आहेत. त्याने 17 शतके आणि 17 अर्धशतके केली आहेत. त्याचा सर्वोत्तम धावसंख्या 265 आहे.

ऋतुराज गायकवाडचा वरचष्मा

ऋतुराज गायकवाडचा सध्या यशस्वीवर वरचष्मा असल्याचे दिसून येते. त्याने अलीकडेच दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध अपवादात्मक कामगिरी केली. जर गायकवाडने सलामीवीर म्हणून एक टोक धरले तर रोहित पहिल्या चेंडूपासून आक्रमकपणे खेळू शकतो. यशस्वी देखील आक्रमक फलंदाजी करतो, त्यामुळे समान शैलीचे दोन सलामीवीर असल्याने सुरुवातीच्या विकेट लवकर पडण्याचा धोका वाढतो.

हे ही वाचा –

Smriti Mandhana Postpones Wedding : मोठी बातमी : स्मृती मानधनाचा होणारा नवरा मुंबईला रवाना, टीम इंडियाही परतली, पलाश मुच्छलचे कुटुंबीय सांगलीतून निघाले

आणखी वाचा

Comments are closed.