गुवाहाटीत भारताची टॉप ऑर्डर फेल ठरली, तेव्हा करुण नायरची Cryptic Post व्हायरल, अश्विनला हसू आवर
करुण नायर क्रिप्टिक पोस्ट : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाला संघर्ष करावा लागत आहे. आधी गोलंदाजीमध्ये आणि नंतर फलंदाजीमध्येही टीम इंडियाला अडथळे पार करत खेळावे लागले. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकत पहिली फलंदाजी निवडली आणि तब्बल दोन दिवस टिकून राहत 489 धावा उभारल्या.
यानंतर भारतीय संघाचा टॉप ऑर्डर तिसऱ्या दिवशी अक्षरशः कोलमडला. के.एल. राहुल, ध्रुव जुरेल, साई सुदर्शन, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यापैकी एकाही खेळाडूने चांगली कामगिरी केली नाही. हे पाहून अनुभवी फलंदाज करुण नायरने एक गूढ पोस्ट शेअर केली आहे.
करुण नायरचा गूढ संदेश
करुण नायरने 24 नोव्हेंबर रोजी एक्सवर आपल्या अधिकृत अकाऊंटवरून एक पोस्ट केली. त्यांनी लिहिले की, “काही परिस्थितींना एक ओळखीचीच भावना असते, आणि मैदानावर नसण्याची शांतताही स्वतःची एक टोचणी देऊन जाते.”
काही परिस्थितींमध्ये तुम्हाला मनापासून माहित असलेली भावना असते — आणि तेथे न राहण्याची शांतता स्वतःची नांगी जोडते.
— करुण नायर (@karun126) 24 नोव्हेंबर 2025
करुण नायरला इंग्लंड दौऱ्यावर तब्बल आठ वर्षांनंतर पुन्हा संघात स्थान मिळाले होते. परंतु इंग्लंड मालिकेत अपयशी ठरल्याने त्याला पुन्हा कसोटी संघातून वगळण्यात आले. वेस्ट इंडीजविरुद्धच्या घरेलू मालिकेत त्याला संधी मिळाली नाही आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. नायरच्या या पोस्टवर रविचंद्रन अश्विनने हसणारा इमोजी शेअर केला.
नमस्कार 😂 https://t.co/PiLMwlYoCe
— अश्विन 🇮🇳 (@ashwinravi99) 24 नोव्हेंबर 2025
आंतरराष्ट्रीय कारकीर्द कशी राहिली?
33 वर्षीय करुण नायरने आत्तापर्यंत भारतासाठी 10 कसोटी आणि 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 41.4 च्या सरासरीने 579 धावा केल्या, तर वनडेमध्ये त्याच्या नावावर 46 धावा नोंदल्या आहेत.
तिसऱ्या दिवशी भारताने खेळ सुरू केला तेव्हा एकही विकेट न गमावता नऊ धावा होत्या आणि आता चहापानाच्या वेळेपर्यंत भारताचा स्कोअर चार विकेटवर 102 धावा आहे. भारत अजूनही दक्षिण आफ्रिकेपेक्षा 387 धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार पंत आणि जडेजा सध्या नाबाद आहेत. फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला 290 धावा करायच्या आहेत.
भारताचा स्कोअर एकेकाळी एक बाद 95 होता आणि भारताने फक्त 7 धावांत आणखी तीन विकेट गमावल्या. आज भारताला पहिला धक्का केएल राहुलच्या रूपात बसला. तो 22 धावांवर बाद झाला. त्यानंतर यशस्वीने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 13 वे अर्धशतक पूर्ण केले, त्याने 58 धावा केल्या. साई सुदर्शन आणि ध्रुव जुरेल संधीचा फायदा उठवू शकले नाहीत. सुदर्शन 57 धावांवर बाद झाला आणि जुरेलही शुन्यावर बाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून सायमन हार्मरने दोन विकेट घेतल्या, तर केशव महाराजने एक विकेट घेतली. जानसेनने एक विकेट घेतली.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.