‘एका युगाचा अंत …’ ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

बॉलीवूडच्या ही मॅनने 89 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांच्या राहत्या घरीच त्यांच्यावर पुढील उपचार सुरू होते. परंतु सोमवारी 24नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही मॅनच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती मिळताच अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

पंजाबमधून आलेला तरुण कसा झाला बाॅलीवूडचा हीमॅन, वाचा

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन तसेच सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार, अनिल कपूर या कलाकारांनी धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. तर करण जोहर, काजोल, शिल्पा शेट्टी, सचिन पिळगांवकर, अजय देवगण यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली.

मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी एक पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. आज एक दिग्गज अभिनेते आपल्याला सोडून गेले पण त्यांचा वारसा कायमचा स्मरणात राहिल असे ते म्हणाले.

दिग्दर्शक करन जोहरने सोशल मीडियावर पोस्ट करत एका युगाचा अंत झाल्याचे म्हटले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री काजोलने तिचा मुलगा युग आणि धर्मेंद्र यांचा एक फोटो शेअर करत बॉलिवूडच्या या कलाकाराला अखेरचा निरोप दिला.

अभिनेता अजय देवगण याने धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं. सिनेसृष्टीने एका दिग्गजाला गमावलं असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

Comments are closed.