रोहित-विराटची एन्ट्री, पंतचा पत्ता कट! जाणून घ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची प्लेइंग इलेव्हन
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा 15 सदस्यीय संघ जाहीर झाला आहे. शुबमन गिल दुखापतीमुळे बाहेर आहे आणि केएल राहुल कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्याही दुखापतीमुळे संघात नाहीत. तिलक वर्मा, रिषभ पंत आणि ऋतुराज गायकवाड यांचे संघात पुनरागमन झाले आहे. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, शेवटी प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
टीम इंडियाने 15 सदस्यांच्या संघाची निवड खूप विचारपूर्वक केली आहे. ऋतुराज गायकवाडला त्याच्या दमदार कामगिरीच्या जोरावर संघात स्थान मिळाले. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर रवींद्र जडेजाची संघात पुनरागमन झाले आहे. गिलच्या अनुपस्थितीत रोहित-जायसवाल ओपनिंग करू शकतात. तिलक वर्माचा अलीकडील फॉर्म रिषभ पंतपेक्षा चांगला आहे. त्यामुळे तो नंबर 4 वर श्रेयस अय्यरच्या जागी खेळू शकतो. प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल, रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश होऊ शकतो.
Comments are closed.