40 वर्षे एकच पक्षात, पण 12 वर्षे अबोला… रावसाहेब दानवे-लोणीकरांचा वाद संपला


जालना : आमचा वाद हा वैयक्तिक नव्हता, आमच्या कार्यकर्त्यांसाठी होता, आता कार्यकर्त्यांसाठीच आम्ही एकत्र आल्याचं सांगत भाजपचे नेते रावसाहेब दानवे (रावसाहेब दानवे) आणि बबनराव लोणीकरांनी (बबनराव लोणीकर) 12 वर्षांचा अबोला संपवल्याचं दिसून आलं. हे दोन्ही नेते 40 वर्षे एकाच पक्षात कार्यरत होते, पण त्यांच्यामध्ये असलेला अबोला जिल्ह्याने पाहिला होता. आता या दोन्ही नेत्यांमधील वाद संपुष्टात आला असून नगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी झोकून देऊन प्रचाराचा धुरळा उडवल्याचं दिसून येतंय.

ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि आमचा वाद हा कार्यकर्त्यांसाठी होता. मात्र त्याचा फायदा हा विरोधकांनी घेतला. आता मात्र आमच्यातील वाद संपला असून दोघे मिळून कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचं वक्तव्य माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं. तर आम्ही मनाने एकत्रच होतो असं मत राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केलं.

रावसाहेब दानवे निवडणुकीवर: कार्यकर्त्यांसाठी वाद मिटवला

यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी आम्ही उभी केली, तिला यश मिळवून दिलं. आता आम्ही एकत्र आलो, यात काही नवल वाटत नाही. आमचे काही वैयक्तिक वाद नाहीत. आमचा वाद हा कार्यकत्यांच्या पदासाठी होता, त्यामध्ये वैयक्तिक वाद नव्हता. तो वाद आता आम्ही संपवला आहे. कोणत्या पदाधिकाऱ्याला संधी द्यायची याचा निर्णय आता आम्ही दोघे मिळून घेणार आहोत. कार्यकर्त्यांसाठी सुरू झालेला हा वाद आता कार्यकर्त्यांसाठी मिटवला आहे.

आम्ही एकत्र आल्याने आता विरोधकांना त्रास होणार आहे. काही लोक जुळली नाहीत. ज्याला जुळायचं आहे ते जुळणारच. ही आमच्या विचारांची लढाई आहे असं रावसाहेब दानवे म्हणाले.

ज्या वेळी जिल्ह्यात भाजप चौथ्या क्रमांकावर होता, त्यावेळी आम्ही काम केलं. आता आमचा पक्ष एक नंबरला आला आहे. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आम्ही एकत्र आलोय, आता तुम्ही एकत्र या असं आवाहन रावसाहेब दानवे यांनी केलं.

बबनराव लोणीकर निवडणुकीबाबत : आम्ही मनाने एक होतो

राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, “आमचा पक्ष हा जिल्ह्यामध्ये एक नंबरवर कायम राहावा यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. जिल्ह्यात आम्ही मोठ्या प्रमाणात विकासकामं केली. आता जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत.”

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.