धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद, आदित्य ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली

बॉलीवूडचे ही मॅनने म्हणून ओळखले जाणारे आणि आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या हृदयात कायमचं खास स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवारी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती मिळताच अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

X वर पोस्ट करत आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र याच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. गेली सहा दशक त्यांनी चित्रपट रसिकांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. देओल कुटुंबीय आणि त्यांच्या चाहत्यांप्रती सहवेदना.धर्मेंद्र ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली… ॐ शांती!”

Comments are closed.