ENG vs AUS: पर्थ कसोटी पराभवानंतर इंग्लंड संघात मोठा बदल! तीन खेळाडूंना स्क्वॉडमधून वगळलं
पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ऍशेस मालिकेच्या पहिल्या कसोटीमध्ये इंग्लंडची फलंदाजी अतिशय खराब झाली आणि त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला (Ashes series 1st test AUS vs ENG) या पराभवानंतर इंग्लंड संघावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशातच टीम मॅनेजमेंटने प्लेइंग इलेव्हनविरुद्ध होणाऱ्या इंग्लंड लायन्सच्या दोन दिवसांच्या पिंक बॉल वॉर्म-अप सामन्यासाठी 3 खेळाडूंना रिलीज केले आहे. हे तिन्ही खेळाडू 29 नोव्हेंबरपासून कॅनबेरातील मनुका ओव्हलवर सराव सामना खेळणार आहेत.
पर्थ कसोटीमधील पराभवानंतर इंग्लंडने जेकब बेथेल (jekab bhethel), मॅथ्यू पॉट्स (Matthew pots) आणि जोश टंग (Josh Tongue) या तिघांना स्क्वॉडमधून बाहेर केले. मात्र, हे तिन्ही खेळाडू पहिल्या कसोटीच्या 12 सदस्यीय संघात आधीपासूनच नव्हते.
टीमच्या निवेदनात म्हटले आहे की, लायन्स टीम, ज्यात ऍशेस टीममधील हे तीन खेळाडूदेखील आहेत, मंगळवारी पर्थहून कॅनबेराला रवाना होईल. यापूर्वीच बेथेल आणि पॉट्स लिलाक हिल येथे लायन्स विरुद्ध क्रिकेट ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हनमध्ये सामन्यात खेळले होते.
बेथेलने दुसऱ्या डावात 85 चेंडूत 44 धावा केल्या आणि 10 षटकांमध्ये 38 धावा दिल्या, पण विकेट मिळाली नाही. पॉट्सने तीन बळी घेतले, त्यात जेक फ्रेझर-मॅकगर्कची मोठी विकेटही होती.
हा सामना क्रिकेट ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हनने 8 विकेट्सने जिंकला. जोश इंग्लिसने 107 चेंडूत नाबाद 125 धावा करून 232 धावांचे लक्ष्य सहज पार केले. काही दिवसांपूर्वी पर्थमध्ये ट्रॅव्हिस हेडने Travis Head) खेळलेल्या तुफानी खेळीचीच आठवण झाली. जोश टंगने इंग्लंड इलेव्हन आणि लायन्स यांच्यातील सराव सामन्यात भाग घेतला होता आणि दोन्ही डावात एक-एक विकेट घेतली.
त्याआधी इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी बेन स्टोक्स आणि त्यांच्या संघाला पिंक बॉलच्या सराव सामन्यात खेळण्याचा सल्ला दिला होता. BBC शी बोलताना वॉन म्हणाले की, इंग्लंडने पिंक बॉलचा सराव केला नाही, तर ते पूर्णपणे हौशीपणा ठरेल. दूधिया प्रकाशात दोन दिवसांचा सामना खेळण्यात काहीच वाईट नाही. उलट त्याने तयारी अधिक चांगली होईल.
त्यांचे मत होते की खेळाडूंनी या संधीचा फायदा घेऊन स्वतःला अधिक मजबूत करायला हवे.
Comments are closed.