PHOTO – मतदार यादीतील गोंधळ तातडीने दूर करा, आदित्य ठाकरे यांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट

मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदारयादीत झालेला गोंधळ तातडीने दूर व्हावा आणि संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष व्हावी, यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते ॲड. अनिल परब, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे, मनसे नेते बाळा नांदगांवकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव सूरज चव्हाण तसेच इतर शिवसेना-मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.