लग्न पुढे ढकललं का? म्युझिक कम्पोजर आणि स्मृतीचा होणारा पलाश मुच्छल नेमकं काय म्हणाला?

बॉलिवूड म्युझिक कंपोजर आणि स्मृती मंधानाचा (Smriti Mandhana) होणारा नवरा पलाश मुच्छलने (Palash Muchhal) त्यांच्या लग्नाच्या स्थगितीबाबत अपडेट दिली आहे. त्याने सोशल मीडियावर सांगितले की, स्मृती मंधानाच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे स्मृती–पलाश यांचे लग्न पुढे ढकलले गेले आहे. पलाशने लोकांना विनंती केली की या संवेदनशील काळात दोन्ही कुटुंबांच्या खाजगीपणाचा आदर करावा.

आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये पलाश मुच्छलने लिहिले, स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे आमचे लग्न स्थगित केले आहे. कृपया या संवेदनशील काळात दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा.

याआधी काही दिवस स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या विविध लग्नाच्या विधींचे संबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. महाराष्ट्रातील सांगली येथे 23 नोव्हेंबरला त्यांचा विवाहसोहळा होणार होता, परंतु अचानक स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना आजारी पडल्याने लग्न स्थगित केल्याच्या बातम्या समोर आल्या.

याचदरम्यान अशीही चर्चा सुरू झाली की, स्मृतीने आपल्या इंस्टाग्रामवरून विधिंचे फोटो आणि व्हिडिओ हटवले आहेत, त्यामुळे दोघांच्या नात्यात काही बिनसले असल्याच्या अफवा अधिक पसरल्या. पण पलाश मुच्छलच्या ताज्या पोस्टने या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

स्मृती मंधाना सतत आपल्या सहकाऱ्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत होती.

Comments are closed.