‘देशाची टीम आहे, कोणाच्या घरची नाही..’ शमींच्या प्रशिक्षकांचा गंभीर-आगरकरांवर संताप

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. कोलकात्यात पहिल्या कसोटीमध्ये 30 धावांनी पराभव झाल्यानंतर गुवाहाटीतल्या दुसऱ्या कसोटीमध्ये भारत 489 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फक्त 201 धावांवर बाद झाला आणि फॉलोऑनही टाळू शकला नाही.

या खराब खेळानंतर माजी भारतीय खेळाडू आणि मोहम्मद शमीचे (Mohmmed Shami) प्रशिक्षक लक्ष्मी रतन शुक्ला (Lakshmi Ratan Shukla) यांनी गौतम गंभीर (Gautam Gambhir & Ajit Agarkar) आणि अजित अगरकर यांच्या निवड प्रक्रियेवर टीका केली. न्यूज 24 शी बोलताना त्यांनी म्हटलं, ही देशाची टीम आहे, कोणाच्या घरची नाही आणि टीम निवडीत मनमानी होत असल्याचा आरोप केला.

ते म्हणाले की, दुसऱ्या कसोटीमध्ये भारत जास्त अष्टपैलू खेळाडू घेऊन उतरला आणि ही हार पत्करणारी प्लेइंग-11 होती. ज्याला हवा त्याला खेळवण्याची जागा नाही, ही देशाची टीम आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

शमीला चांगली कामगिरी करूनही संधी न दिल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, शमी फिट असूनही त्याला मुद्दाम दुर्लक्षित केले जात आहे. शमीने रणजीमध्ये 4 सामन्यांत 20 विकेट घेतल्या आहेत.

अगरकर यांनी आधी सांगितले शमी फिट नव्हता. या विधानालाही शुक्लांनी विरोध केला आणि शमी पूर्णपणे फिट असल्याचे सांगितले.

लक्ष्मी रतन शुक्ला यांनी भारतासाठी फक्त 3 वनडे खेळले असले तरी त्यांचा घरगुती क्रिकेट रेकॉर्ड दमदार आहे. 137 फर्स्ट क्लास सामन्यांत 6217 धावा आणि 172 विकेट, तसेच लिस्ट-A आणि टी-20 मध्येही उत्तम कामगिरी त्यांनी केली आहे.

Comments are closed.