IPL 2026 च्या नीलामीत या 7 खेळाडूंची विक्री कठीण, ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडूही अनसोल्ड राहणार?

आयपीएल 2026 (IPL 2026) ऑक्शनमध्ये 10 संघाना एकूण 77 रिकामे स्लॉट भरायचे आहेत. यामध्ये सर्वात जास्त स्लॉट कोलकाता नाईट रायडर्सकडे (13 खेळाडू 6 विदेशी) आहेत, तर सर्वात कमी स्लॉट पंजाब किंग्सकडे (4 खेळाडू) आहेत.
ऑक्शन 16 डिसेंबरला अबू धाबीमध्ये होणार आहे. अनेक खेळाडूंवर मोठ्या बोली लागतील, पण काही खेळाडू जे कधी त्यांच्या टीमचे स्टार होते, ते यावेळी अनसोल्ड राहू शकतात.

विजय शंकर

विजय शंकर (Vijay Shankar) आधी चेन्नई सुपर किंग्समध्ये (CSK) होता, पण या वेळेस फ्रेंचायझीनं त्याला रिटेन केलं नाही. 34 वर्षीय विजय शंकरला सीएसकेने मागील सीझनला 1.20 कोटींना घेतलं होतं. त्याने 6 सामने खेळून 118 धावा केल्या होत्या. त्याच्याकडून गोलंदाजी करून घेतली नव्हती. त्याचं एकूण आयपीएल करिअर पाहता, त्याने CSK, SRH, DC आणि GT या 4 टीमसाठी 78 सामने खेळले आहेत, 1233 धावा आणि 9 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे यावेळी ऑक्शनमध्ये त्याच्यावर बोली लागणे कठीण दिसत आहे.

राहुल त्रिपाठी

राहुल त्रिपाठी 2022 ते 2024 या काळात तो सनरायझर्स हैदराबादकडे होता, त्याची प्राइस 8.50 कोटी होती. मागील वर्षी त्याची सॅलरी कमी झाली, पण तो सीएसकेकडे गेला. सीएसकेने त्याला 3.40 कोटींना घेतले होते. पण त्याने 5 सामन्यांत फक्त 55 धावा केल्या. त्यामुळे सीएसकेने त्याला रिलीज केले. 34 वर्षांचा राहुल त्रिपाठी यावेळीही अनसोल्ड राहू शकतो. त्याने 2017 पासून RPS, RR, KKR, SRH आणि CSK अशा 5 टीमसाठी 100 सामने खेळून 2291 धावा केल्या आहेत.

मोहित शर्मा

37 वर्षांचा मोहित शर्मा यावर्षी ऑक्शनमध्ये विकला जाणे अवघड दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्याला मागील सीझनला 2.20 कोटींना घेतले होते, पण त्याने 8 सामन्यांत फक्त 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे दिल्लीने त्यालाही रिलीज केले. त्याने 2013 मध्ये सीएसकेकडून आयपीएल करिअरची सुरुवात केली.
आतापर्यंत CSK, PBKS, GT आणि DC कडून 120 सामने खेळून 134 विकेट्स घेतल्या आहेत.

ग्लेन मॅक्सवेल

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू असला तरी आयपीएलमध्ये त्याची कामगिरी अनेकदा निराशाजनक ठरली आहे. 2021 मध्ये RCB ने त्याला 14.25 कोटींना घेतले होते. 2022-24 दरम्यान तो RCB कडे 11 कोटींना होता. पण RCB ने त्याला रिलीज केल्यानंतर पंजाबने त्याला 4.20 कोटींना घेतले. 2025 मध्ये त्याने 7 सामने खेळून फक्त 48 धावा केल्या. पंजाब किंग्स फायनलमध्ये पोहोचला असला तरी त्यात मॅक्सवेलचा काहीच वाटा नव्हता. त्यामुळे पंजाबनेही त्याला रिटेन केले नाही. त्यामुळे 2026 ऑक्शनमध्ये त्याच्यावर बोली लागण्याची शक्यता खूपच कमी आहे.

faf du plessis

41 वर्षांचा फाफचे वयही टीम्ससाठी एक मोठा विचाराचा विषय आहे. त्याने 2012 पासून आयपीएल खेळला आहे. मागील सीझनमध्ये तो दिल्ली कॅपिटल्सकडे होता आणि त्याने 9 सामन्यांत 202 धावा व 2 अर्धशतके केली होती. पण दिल्लीने त्याला रिलीज केले आहे आणि या वयात त्याच्यावर कोणती टीम दाव लावेल अशी शक्यता कमी वाटते. त्याने आयपीएलमध्ये एकूण 154 सामना खेळून 4773 धावा आणि 39 अर्धशतके केली आहेत.

मोईन अली

38 वर्षांचा इंग्लिश अष्टपैलू मोईन अलीला (Moin Ali) केकेआरने मागील ऑक्शनमध्ये बेस प्राइस 2 कोटींना घेतले होते. पण त्याचा परफॉर्मन्स साधारणच होता. 6 सामने, 6 विकेट्स आणि 2 इनिंग्जमध्ये फक्त 5 धावा. त्यामुळे केकेआरनेही त्याला रिलीज केले आहे. वय आणि फॉर्म पाहता, यंदा त्याचे विकले जाणे कठीण आहे.

करण शर्मा

मुंबई इंडियन्सने 20 खेळाडूंना रिटेन केले, पण त्यात कर्ण शर्मा नव्हता.
त्याला मागील वर्षी मुंबईने 50 लाखांना घेतले होते. त्याने 6 सामने खेळले आणि 5 सामन्यांत 7 विकेट्स घेतल्या. त्याची इकॉनॉमी 8.53 होती, तसेच मागील काही वर्षांतील त्याचा परफॉर्मन्सही कमजोर राहिला आहे. 38 वर्षांचा कर्ण शर्मा यावेळी ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहू शकतो.

Comments are closed.