गुवाहाटी कसोटी सामना पराभूत होण्याच्या उंबरठ्यावर भारतीय संघ का उभा? अनिल कुंबळेंनी सांगितलं नेमकं कारण

गुवाहाटीमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडिया (Team india) पराभवाच्या उंबरठ्यावर उभी आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकलेल्या दक्षिण आफ्रिकी संघाने दुसऱ्या कसोटीमध्येही दबदबा कायम ठेवला आहे. पहिला कसोटी जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात तब्बल 288 धावांची आघाडी मिळवली. भारतावर क्लीन स्वीपचा धोका निर्माण झाला आहे.

भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble ) यांनी दुसऱ्या कसोटीमध्ये भारत 288 धावांनी पिछाडीवर गेल्यानंतर भारतीय फलंदाजांच्या दृष्टिकोनाची टीका केली. तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव 201 धावांवर आटोपला.

अनिल कुंबळे यांनी जियोस्टारशी बोलताना सांगितले, मला वाटते भारताची फलंदाजी अतिशय खराब होती. कसोटी क्रिकेटसाठी लागणारी जिद्द आणि संयम दिसली नाही. काही चांगल्या चेंडूंचा सामना करावा लागला, पण फलंदाज कठीण स्पेलसाठी तयार नव्हते. असे वाटत होते की जलद लक्ष्याचा पाठलाग करण्याचीच मानसिकता होती, जी कसोटी क्रिकेटमध्ये योग्य नाही. इतक्या मोठ्या स्कोरपर्यंत हळूहळूच जाता येते. भारताने ती जिद्द अजिबात दाखवली नाही.

दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन म्हणाले की, भारतात परदेशी संघ तीन दिवस सातत्याने वर्चस्व राखतो, असे सहसा होत नाही. त्यांनी म्हटले, भारतामध्ये परदेशी संघ तीन दिवस असा दबदबा कायम ठेवतो, हे क्वचितच पाहायला मिळते. गुवाहाटीमध्ये त्यांची योजना आणि तिची अंमलबजावणी भारतीयांवर भारी पडली.

पहिल्या डावात 288 धावांची मोठी आघाडी घेतल्यानंतर तिसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेने दुसऱ्या डावात कोणताही विकेट न गमावता 26 धावा केल्या. त्यांची एकूण आघाडी 314 धावांची झाली आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी आतापर्यंत मार्को जान्सनने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने प्रथम 93 धावा केल्या आणि नंतर गोलंदाजीत 6 विकेट घेतल्या.

Comments are closed.