IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाची अत्यंत निराशाजनक कामगिरी! तिसऱ्या दिवशी या 7 खेळाडूंचा फ्लॉप शो
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या सीरीजचा शेवटचा सामना 22 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने अत्यंत निराशाजनक खेळ केला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावा केल्या होत्या, त्याच्या प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 201 धावांवर संपला.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेकडे 314 धावांची आघाडी होती. भारताकडून 7 खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली.
भारताकडून 7 खेळाडूंनी खराब प्रदर्शन केले. या यादीत केएल (KL Rahul) राहुलचा समावेश आहे. त्यांनी 63 चेंडूत 22 धावा केल्या. त्याशिवाय नितीश रेड्डीही (Nitish Kumar Reddy) काही खास करू शकला नाही. त्याने 18 चेंडूत 10 धावा केल्या. रवींद्र जडेजादेखील (Ravindra Jadeja) 18 चेंडूत 6 धावा करून मैदानाबाहेर परतला. एकूणच भारताचे 7 खेळाडू पूर्णपणे फ्लॉप ठरले.
Comments are closed.