भिकारxx, पवारांची ‘दादा’गिरी बाकी नेत्यांची शहरं

मी पालकमंत्री आहे, माझं लक्ष असतं. मी कामाचा माणूस आहे, आधी करतो मग बोलतो. इतर नेते आणि त्यांची शहरं भिकारxx आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार निधी देण्यावरून दादागिरी करणारी वक्तव्य सातत्याने करत आहेत. बीड येथील सभेतदेखील आज त्यांचा प्रत्यय आला. मी शब्दाचा पक्का आहे, माझ्यावर आरोप-प्रत्यारोप होतात पण मी स्वच्छ काम करण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या भागात करून दाखवलं तेव्हा तुमच्याकडे येऊन बोलतोय. मात्र, बाकीचे नेते, त्यांची शहरं भिकारxx असतात?, असे म्हणत अजित पवारांनी इतर नेत्यांवर हल्ला केला. अनेक पक्षाने मला उपमुख्यमंत्री पद दिलं. आता जरी आरोप करत असले तरी मागे त्यांनीच मला तिथे बसवलं. हे वागणं बरं नव्हं हे लक्षात ठेवा, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीतील नेत्यांना लक्ष्य केलं.

Comments are closed.