बिग बॉस मराठी पुन्हा येतोय…

मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक प्रतीक्षित रिऑलिटी शो बिग बॉस मराठी आपला सहावा सीझन घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. यंदाचे वेगळेपण काय असेल? थीम काय असेल? सदस्य कोण असतील? घर कसे असेल? यंदाचा गेम प्लॅन काय असणार? यावेळेस सूत्रसंचालन रितेश देशमुख करणार का? या सर्व प्रश्नांमुळे बिग बॉसच्या पुनरागमनाची वारे सगळीकडे वाहू लागले आहेत. कलर्स मराठीकडून सादर करण्यात आलेल्या खास टीझरमध्ये प्रेक्षकांना यंदाच्या सीझनच्या थीमचा सर्वात महत्त्वाचा संकेत मिळाला तो म्हणजे दरवाजा. या वेळी एक नाही तर अनेक दरवाजे असणार आहेत. यंदाचा खेळ अजूनच धमाकेदार होणार आहे हे निश्चित! लवकरच हा शो कलर्स मराठीवर आणि जिओ हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे.

Comments are closed.