आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत वैष्णवी लोहकरेला 2 कांस्य

एण्डुरन्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित एण्डुरन्स वर्ल्ड चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत मुंबईच्या वैष्णवी जयेश लोहकरेने 2 कांस्य पदके जिंकण्याची कामगिरी केली. पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत वैष्णवीने 7 वर्षांखालील स्पीड क्वॉड गटात 2 मिनिटे, 1 मिनिट आणि 20 सेपंद अशा तीन प्रकारात सहभाग घेतला. त्यातील 2 मिनिटे आणि 20 सेपंद या प्रकारात वैष्णवीने प्रत्येकी 1 अशी एपूण 2 कांस्य पदके पटकावली. वैष्णवी लोहकरे ही दादर येथील बालमोहन विद्यामंदिर शाळेची विद्यार्थिनी आहे. बोरिवलीच्या आयएनडीआरएस क्लबचे राज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ती स्केटिंगचा सराव करते.

Comments are closed.