एल्फिन्स्टन पुल पाडण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर घ्यावा लागणार 20 तासांचा ब्लॉक, ओव्हरहेड वायर काढण्यासाठी लागणार सर्वाधिक वेळ

परळ आणि प्रभादेवी स्टेशनदरम्यानच्या अंशतः पाडलेल्या एल्फिन्स्टन पुलाचे गर्डर्स काढण्यासाठी 20 ते 23 तासांचा मेगाब्लॉक घेण्याची शक्यता जवळजवळ निश्चित झाली आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. सोमवारी रेल्वे अभियंत्यांनी परळ बाजूला असलेल्या अर्धवट तोडलेल्या रोड ओव्हर ब्रिजखाली भेट देऊन पाडकामासाठी लागणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. पुलाच्या संरचनेमध्ये 25 हजार व्होल्ट वीजपुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक केबल्स आणि ब्रॅकेट इन्सुलेटर्स वेल्ड केलेले असल्यामुळे ते काढणे ही सर्वात वेळखाऊ प्रक्रिया ठरणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

या पुलाखाली फास्ट आणि स्लो मार्गांच्या प्रत्येकी दोन रेल्वे लाईन्स आणि एक सायडिंग लाईन जाते. ओव्हरहेड केबल्सची लांबी सरासरी दोन ते चार किलोमीटर असून त्यांना पूर्णपणे काढून टाकाव्या लागणार आहेत. या कामासाठी 23 ते 24 तासांचा ब्लॉक आवश्यक असून त्यापैकी तीन ते चार तास फक्त ओव्हरहेड केबल्स काढण्यात जातील. पहिल्या टप्प्यात मध्य रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाईल आणि नंतर पश्चिम रेल्वेवरील काम पूर्ण केले जाईल. मागील आठवड्यात यासाठी 20 तासांचा एकच ब्लॉक, अनेक लहान ब्लॉक्स किंवा ओव्हरहेड सरकवण्याचा तांत्रिक पर्याय यावर चर्चा झाली होती, परंतु सध्या 20 तासांचा एकसंध ब्लॉक घेतला जाण्याची दाट शक्यता आहे.

एल्फिन्स्टन ब्रिज पाडण्याचे काम 10 सप्टेंबरला सुरू झाले असून रस्ता आणि फुटपाथवरील पsव्हर ब्लॉक्स काढण्यात आले आहेत. 167 कोटी रुपयांचा हा प्रकल्प शिवडी – वरळी एलिवेटेड कनेक्टरचा भाग असलेल्या नवीन डबल-डेकर उड्डाणपूलाच्या बांधकामासाठी आहे.

पाडकाम जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून नवीन पूल जानेवारी 2027 पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, प्रकल्पासाठी रेल्वे परिसराचा वापर केल्याबद्दल आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर वाद सुरू असून मध्य रेल्वेने सुधारित शुल्कानुसार 47 कोटी तर पश्चिम रेल्वेने 59.14 कोटी रुपये मागितले आहेत.

Comments are closed.