गौरी पालवेंच्या मृतदेहावर सासऱ्यांकडून अंत्यसंस्कार, गावात पालवे-गर्जेंचे नातेवाईक एकमेकांना का


पाथर्डी (जि. अहिल्यानगर) : राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे  स्वीय सहायक (PA) अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जे (Gauri Palave) यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. त्यांच्या या टोकाच्या निर्णयानंतर त्यांच्या कुंटुबीयांकडून अनेक आरोप करण्यात आले आहेत. काल अनंत गर्जेला पोलिसांनी अटक केली, दरम्यान डॉ. गौरी पालवे गर्जे (Gauri Palave) यांच्यावर मोहोज देवढे येथील त्यांच्या सासरच्या घरासमोरच काल (सोमवारी) सकाळी तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी आरोपी अनंत गर्जे याला अटक करण्याची मागणी नातेवाइकांनी केली. त्यावर अनंत गर्जे स्वतःहून पोलिसांना शरण आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर, गौरी गर्जे यांचा अंत्यविधी सासरच्या घरासमोरच करण्याची ठाम भूमिका माहेरच्या लोकांनी घेतली. त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर सासरच्या घरापासून काही अंतरावर गौरी (Gauri Palave) यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सासरे भगवान गर्ने यांनी विधी पार पाडला. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

Anant Garje & Gauri Palve: तणावपूर्ण वातावरणात सासऱ्यांनी पार पाडला अंत्यविधी

काल (सोमवारी दि.२४) सकाळी गौरी यांचा मृतदेह मोहोज देवढे येथे आणण्यात आला. यावेळी माहेरकडील लोकांनी सासरच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याची भूमिका घेतली. यावेळी सासरच्यांनी त्यास विरोध केला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी मोठा वाद निर्माण झाला. घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून लोकांना शांत केले. सर्वांची समजूत घातली.पोलिसांनी परिस्थिती हाताळून सुरळीत केली. अखेर घरापासून काही अंतरावर गौरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिच्या वडीलांनी आक्रोश केला.

Anant Garje & Gauri Palve:  श्रीमंताच्या नादी लागू नका, भपक्यावर जाऊ नका…

गौरीच्या अंत्यसंस्काराला वडील धाय मोकलून रडले, पोलिसांना म्हणाले, ‘तुम्हाला मुली असतील तर मला न्याय द्या’. ‘तुम्हाला मुली असतील, तर त्या गरिबाला द्या. श्रीमंतांच्या नादी लागू नका, त्यांच्या भपक्यावर जाऊ नका…’ असं म्हणत गौरीच्या वडिलांनी पोलिसांसमोरच न्यायासाठी हंबरडा फोडला.

रविवारी रात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली होती. अनंत गर्जे याच्यासह त्याचा भाऊ आणि बहिणीवर डॉ. गौरी पालवे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत गर्जे यांना आज न्यायालयात हजर केले जाणार असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत होऊ शकते.अनंत गर्जे यांच्या वरळीतील घराची झाडाझडती घेण्यात आली आहे.

Anant Garje & Gauri Palve: गर्जेंच्या प्रेमसंबंधांविषयी गौरीच्या कुटुंबीयांना अगोदरच माहिती होतं

मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेच्या प्रेमसंबंधाबाबत लग्नापूर्वीच डॉ. गौरी पालवेच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले होते, असा दावा त्याच्या वकिलाने पोलिस कोठडीला विरोध करताना न्यायालयात केला आहे. अशोक पालवे यांनी जबाबात उल्लेख केलेली मूळ कागदपत्रे लातूर येथील रुग्णालयात आहेत. ती ताब्यात घेऊन गौरी पालवेंचे वडील अशोक पालवे यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा करावी लागेल. अनंत गर्जेसह त्याच्या भावंडांवर देखील आरोप आहेत. त्यांचाही शोध सुरू असून त्यांची चौकशी करणे बाकी असल्याचे सांगत सरकारी वकिलांनी गर्जेच्या कोठडीची मागणी केली.

अनंत गर्जेचे वकील अॅड. मंगेश देशमुख यांनी कोठडीला विरोध करत, दाखल गुन्ह्यातून डॉ. गौरी यांना आरोपीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्ट होत नसल्याचे म्हटले. घटना घडली तेव्हा डॉ. गौरी घरी एकट्याच होत्या. त्यांनी घर आतून बंद केले होते. शिवाय प्रेमसंबंधांबाबत आरोपीने लग्नापूर्वीच डॉ. गौरी यांच्या कुटुंबीयांना कल्पना दिली, असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने गर्जेला २७पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.