वाढवण बंदरासाठी जिल्हा प्रशासनाच्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेला स्थानिक ग्रामस्थांचा कडाडून विरोध, पथकाला गावात केली बंदी

वाढवण बंदर प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेचा स्थानिक ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला आहे. सोमवारी जिल्हा भूमापन विभागाचे पथक पोलिस बंदोबस्तासह वरोर गावात सर्वेक्षणासाठी पोहोचले असताना ग्रामस्थांनी एकजुटीने पथकाला गावात प्रवेश नाकारला.
प्रकल्पग्रस्त शेतीजमिनी व झाडांचे सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र नुकसानभरपाईसंदर्भात स्पष्टता नसणे, प्रशासनाकडून होत असल्याचा आरोप असलेली दडपशाही आणि ग्रामस्थांच्या हक्कांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे या मुद्द्यांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वेक्षणाला ठाम विरोध नोंदवण्यात आला.
या संपूर्ण प्रकरणात वरोर ग्रामस्थांनी शांततामय पण निर्धारपूर्वक भूमिका घेत, जमीन, वनसंपत्ती व उपजीविकेच्या संरक्षणासाठी एकमताने संघर्ष करण्याचा निर्णय जाहीर केला.
वाढवण बंदराच्या अधिग्रहण प्रक्रियेला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध,
पथकाला गावात केली बंदी pic.twitter.com/Gk3sjwAsG0— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 25 नोव्हेंबर 2025

Comments are closed.