नवीन घर घेणाऱ्यांना मोदी सरकारचं मोठ्ठं गिफ्ट, होम लोन व्याजावर 4 टक्के अनुदान, कोणाला लाभ?


गृहकर्ज व्याज अनुदान: आपलं स्वतःचं घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. फक्त हे स्वप्न सत्यात आणणं सहज शक्य नसतं. बहुदा लोक हे स्वप्न केवळ त्यांच्या आयुष्यातील कष्टाने कमावलेल्या ठेव भांडवलमधून साध्य करतात. तर दुसरीकडे हेच स्वप्न सध्या करण्यासाठी शासनाच्या काही योजना मोठ्या फायदाभाऊ ठरत असतात. अशातच आता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या घटकांना हे स्वप्न साकार करण्यास मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. त्याचा थेट फायदा मध्यमवर्गीय व्यक्तींना होणार आहे. हा फायदा कसा मिळेल ते आता समजून घेऊया.

देशभरातील मध्यमवर्गीय व्यक्तींच्या आयुष्यात आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारची प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (Pradhan Mantri Gramin Awas Yojana) मोठी फायदाभाऊ ठरते आहे. विशेषतः हि योजना मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत्यामुळे असल्याचा दावा सरकारने केला आहे. बहुतेक लोक घर खरेदी करण्यासाठी आणि दीर्घ कालावधीसाठी उच्च व्याजदराचे (EMI) भरण्यासाठी गृहकर्ज घेतात. म्हणूनच बरेच लोक घर खरेदी करण्याची आशा सोडून देतात. अशा व्यक्तींसाठी, मोदी सरकारच्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना) आराम दिलाय. गेल्यावर्षी 2024 मध्ये केंद्र सरकारने आवास योजना-शहरी (PMAY-U) 2.0 साठी सुद्धा मंजुरी दिली. या योजनेतंर्गत मध्यम वर्ग, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि निम्न उत्पन्न वर्गातील लोकांना पहिले घर खरेदीसाठी व्याजदरात सबसिडी देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय.

कोणाला आणि किती मिळणास सबसिडी अन् काय आहेत अटी?

केंद्र सरकारने आवास योजना-शहरी (PMAY-U 2.0) अंतर्गत व्याज सबसिडी मिळणार आहे. केवळ 35 लाखांपर्यंतची किंमत असणाऱ्या घरांसाठी ही सबसिडी लागू असणार आहे. पण अशा घरासाठी तुमच्या कर्जाचा आकडा हा 25 लाख अथवा त्यापेक्षा कमी असावा अशी अट घालण्यात आली आहे. तर कर्जाचा कालावधी 12 वर्षांचा असेल तर 8 लाख रुपयांच्या कर्जावर 4 टक्के व्याज सबसिडी देखील मिळणार आहे.

तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही? कसे तपासायचे?

जर एखाद्या पात्र व्यक्तीचे नाव यादीतून गहाळ असेल, तर ते पीएमएवाय-जी (PMAY-U 2.0) पोर्टलद्वारे किंवा त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला भेट देऊन अर्ज करू शकतात. आधार कार्ड, बीपीएल/एसईसीसी यादीतील नावाचा पुरावा आणि बँक खात्याची माहिती यासारखी कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्ज पूर्णपणे मोफत आहेत आणि मान्यता सरकारच्या प्राधान्य यादीवर आधारित आहे, जी दरवर्षी अपडेट केली जाते. लाभार्थी नोंदणी क्रमांक नसतानाही पीएमएवाय-जी (PMAY-U 2025) यादीतील त्यांचे नाव ऑनलाइन किंवा मोबाईल फोनद्वारे तपासू शकतात.

पीएमएवाय-जीची अधिकृत वेबसाइट, pmayg.nic.in ला भेट द्या. ‘स्टेकहोल्डर्स’ विभागात क्लिक करा आणि ‘IAY/PMAYG लाभार्थी’ किंवा ‘लाभार्थी शोधा’ निवडा. जर तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल, तर ‘अ‍ॅडव्हान्स्ड सर्च’ वर क्लिक करा आणि तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा. कॅप्चा एंटर करा आणि ‘सबमिट करा’ वर क्लिक करा. – असे केल्याने तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवर दिसेल, ज्यामध्ये मंजुरीची स्थिती आणि हप्त्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती समाविष्ट असेल.

आणखी वाचा

Comments are closed.