Brain Health : हे छंद मेंदूचे आरोग्य उत्तम राखण्यास करतात मदत
मानसिक आरोग्य सुधारण्याचे अनेक मार्ग आहेत. यांपैकी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आवडीचा छंद जोपासणे. छंद विविध प्रकारचे जोपासले जातात. छंद जोपासल्याने तुमचे मन काही काळासाठी वाईट गोष्टींपासून दूर जाते तसेच मेंदूही सक्रिय राहतो. शरीरातील तणावाचे हार्मोन्स कमी होतात आणि तुम्हाला फ्रेश वाटते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे छंद जोपासल्यामुळे तुम्ही मोबाईलपासून दूर राहता. त्यामुळे आज आपण असे छंद जाणून घेऊयात जे मेंदूचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करतात .
वाद्य वाजविणे –
कोणतेही वाद्य वाजवल्याने मेंदूमध्ये अनेक बदल होतात. हे बदल सकारात्मक असतात, ज्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते. वाद्य वाजवल्याने तणाव आणि चिंता कमी होते.
वॉटर कलर पेंटिंग –
कॅनव्हासवर पेटिंग केल्याने तणाव कमी होतो. यासाठी तुम्हाला परफेक्ट पेटिंग यायलाच हवे असे नाही. तुम्ही साध्या पांढऱ्या कागदावर रंग फेकलेत तरी मन प्रसन्न होते. पेटिंग करताना मन एकाग्र होण्यास मदत मिळते.
हेही वाचा – Pregnancy Tips: गर्भधारणा कधी सोपी होते? किती वेळा संबंध ठेवावा लागतो, जाणून घ्या संपूर्ण
हायकिंग, ट्रेकिंग –
ताणतणाव आणि चिंता यापासून मुक्तता मिळण्यासाठी निसर्गांच्या सौंदर्यात वेळ घालवावा. निसर्गासोबत वेळ घालवल्याने मनातील नकारात्मकता दूर होते आणि तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकता. त्यामुळे हायकिंग, ट्रेकिंगला जाऊ शकता.
कोडे सोडवा –
कोणतेही कोडे सोडवता तेव्हा तुम्ही इतर सर्व गोष्टी विसरता. ज्यामुळे मेंदूचे सक्रिय राहतो आणि त्याचे आरोग्यही उत्तम राहते.
विणकाम –
विणकाम हे लक्ष केद्रिंत करण्याचा एक उत्तम प्रकार आहे. हा छंद जोपासल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. विणकामात गुंतून राहिल्याने एकटेपणा जाणवत नाही. ज्यामुळे नैराश्याचा धोका निर्माण होत नाही.
फुलांसोबत वेळ घालवा –
रंगीबेरंगी फुले पाहा. तुम्ही आवडत्या व्यक्तीसाठी किंवा स्वत:साठी गुलदस्ता बनवू शकता. फुलांकडे पाहिल्यावर ताण दूर होतो आणि मूडही बदलतो.
कँडल्स बनवा –
कँडल्स बनवताना नवीन विचार करावे लागतात. तुम्ही विविध डिझाइन्सचा वापर करतात. ज्यामुळे तुमची विचार करण्याची क्षमता वाढते.
(ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा – Periods Health : मासिक पाळीत अंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवा
Comments are closed.