जेव्हा स्वतःला बॉस बनवता, तेव्हा असंच होतं’, गुवाहाटी कसोटीदरम्यान विराट कोहलीच्या भावाचा गंभीरला जोरदार टोला!

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (Test series IND vs SA) कसोटी मालिकेतील प्रदर्शन अतिशय निराशाजनक ठरले आहे. गुवाहाटी कसोटीमध्ये भारतीय संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात खराब कामगिरी केली. आता टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर उभी आहे. 549 धावांचे लक्ष्य दिल्यानंतर टीम इंडिया केवळ 27 धावांवर 2 विकेट गमावून बसली आहे. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या दिवशी विजयासाठी फक्त 8 विकेट घ्यायच्या आहेत. हेड कोच गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) यांच्यावर जोरदार टीका होत आहे आणि आता विराट कोहलीच्या (Virat Kohli) भावानेही गंभीरवर सडकून टीका केली आहे.

गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे प्रदर्शन अत्यंत खराब झाले आहे. गुवाहाटी कसोटीदरम्यान विराट कोहलीचा (Virat Kohli) भाऊ विकास कोहलीने इंस्टाग्राम थ्रेड्सवर पोस्ट टाकत गंभीरचे नाव न घेता त्यांच्यावर तिखट टोमणा मारला. त्याने सांगितले की, टीम इंडियाचा ‘बॉस’ बनण्याच्या नादात गंभीरने सर्व काही बिघडवून टाकले.

विकास कोहली म्हणाला,
एक काळ असा होता की आपण परदेशात जिंकण्यासाठी खेळायचो. आता आपल्या घरच्या मैदानावरही सामना वाचवण्यासाठी खेळण्याची वेळ आली आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला बॉस बनवण्याचा आणि कधीही न बिघडलेल्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करता, तेव्हा असंच होतं.

गौतम गंभीर हेड कोच झाल्यापासून कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे प्रदर्शन सातत्याने खालावत गेले आहे. त्यांनी जुलै 2024 मध्ये टीम इंडिया प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 18 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त 7 सामने जिंकले आहेत. दोन सामने ड्रॉ झाले असून 9 सामन्यांत टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला आहे. आता गुवाहाटीतही टीम इंडियाचा पराभव जवळपास निश्चित दिसत आहे. त्यामुळे गंभीर यांचा हेड कोच म्हणूनचा विक्रम आणखी खराब होऊ शकतो.

Comments are closed.