मणिपूरमध्ये शोधमोहिमेत शस्त्रे, दारूगोळा जप्त

वृत्तसंस्था/ इंफाळ

मणिपूर पोलिसांनी गेल्या दोन दिवसात सीमा आणि संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली. सुरक्षा दलांनी चुराचंदपूर जिह्यातील बोल्नियो भागातून सात प्रक्षेपक लाँचर, 11 पंपी प्रक्षेपक एचई बॉम्ब, सात देशी बनावटीच्या रायफल, दोन पिस्तूल, मॅगझिन, जिवंत राउंड, बाओफेंग हँडसेट आणि नऊ बुलेटप्रूफ जॅकेटसह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 25 वर्षीय डिजिटल कंटेंट क्रिएटर युमखैबाम शांतीकुमार याला अटक केली. पोलिसांनी एनएच-37 वर जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या 318 वाहनांची तपासणी केली. या कारवाईसाठी राज्यभरात 112 चौक्या उभारण्यात आल्या होत्या.

Comments are closed.