पाचव्या दिवशी कोण जिंकणार? टीम इंडिया 90 षटके तग धरणार? दक्षिण आफ्रिकेला फक्त 8 विकेटची गरज
India vs South Africa 2nd Test Day 5 Match Live Scorecard : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा आज निर्णायक दिवस आहे. सामना वाचवायचा असेल तर टीम इंडियाला अखेरच्या दिवशी पूर्ण 90 षटके तग धरून 8 विकेट वाचवाव्या लागणार आहेत. तर आधीच मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला केवळ 8 विकेटची गरज आहे.
चौथ्या दिवसाच्या अखेरीस 549 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 27 धावांवरच दोन्ही सलामीवीर गमावले. नाईट वॉचमन म्हणून आलेला कुलदीप यादव 4 धावांवर, तर साई सुदर्शन 2 धावांवर नाबाद आहेत. यापूर्वी यशस्वी जैस्वाल 13 आणि के.एल. राहुल 6 धावा करत बाद झाले.
सामन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावा ठोकल्या, तर भारतीय संघ पहिल्या डावात केवळ 201 धावांवर गारद झाला. त्यानंतर आफ्रिकन कर्णधार बावुमा यांनी भारताला फॉलो-ऑन न देता पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात त्यांनी 5 बाद 260 धावांवर डाव घोषित करत भारतासमोर 549 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले.
कोलकात्यातील पहिला कसोटी भारत 30 धावांनी हरला होता. त्यामुळे मालिकेत टिकून राहण्यासाठी या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करणे हा एकमेव पर्याय उरला आहे. परंतु परिस्थिती पाहता ते कठीण वाटत आहे. क्लीन स्वीप टाळायचा असेल तर भारताला हा सामना ड्रॉ करावा लागणार आहे. एकंदरित, जगज्जेता दक्षिण आफ्रिका भक्कम स्थितीत असून मालिकेची विजेतेपद त्यांच्या एकहाती दिसत आहे.
Comments are closed.