नीलेश दगडे, लवीना ‘नवकिरण श्री’

अंधेरी चार बंगला येथील नवकिरण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी शरीरसौष्ठव स्पर्धेत पुरुष गटात नीलेश दगडे आणि महिला गटात लवीना नरोना ‘नवकिरण श्री’ पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशन ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने आणि मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन सदडेकर यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आयोजित केली होती.
यावेळी प्रमोद कृपाळ, शशिकांत सावंत, प्रल्हाद सदडेकर, बृहन्मुंबई वृत्तपत्र विव्रेता संघाचे रवींद्र चिले, जीवन भोसले, रवी संसारे, मेजर अरुण शिरीषकर यांच्यासह सुभाष राणे, रीना मुलीया, महेंद्र सुर्वे, सौरभ फणसोपकर, संतोष चव्हाण, उषा रामटेके, भाग्यलक्ष्मी, राजेश सावंत, सुनील शेडगे, विशाल परब उपस्थित होते.

Comments are closed.