‘मिस युनिव्हर्स 2025’ स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात

'मिस युनिव्हर्स 2025’ ची अंतिम फेरी 21 नोव्हेंबर रोजी बँकॉकमध्ये पार पडली. मेक्सिकोच्या फातिमा बॉशने किताब जिंकला. परंतु सुरुवातीपासूनच ही स्पर्धा वादांमुळे गाजली होती. अद्यापही हे वाद कायम  असल्याचे दिसून येत आहे. कोट डी’आयव्होअरच्या ओलिव्हिया यासे हिने ‘मिस युनिव्हर्स आफ्रिका आणि ओशनिया 2025’ चा किताब परत करणार असल्याचे जाहीर केले आहे.

अंतिम फेरीनंतर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडीओंमुळे, ऑलिव्हियाचा आत्मविश्वास आणि प्रभावी कामगिरी अधोरेखित झाली. त्यामुळे लोकांनी तिला योग्य विजेती म्हटले आहे, मात्र तिला टॉप-5  मध्ये समाधान मानावे लागले. ‘मिस युनिव्हर्स 2025’ ज्युरीचे सदस्य लेबनीज-फ्रेंच संगीतकार ओमर हार्फोचे यांनी अंतिम फेरीच्या तीन दिवस आधी राजीनामा दिला. त्यांनी खुलासा केला की, ‘मिस मेक्सिको’चा विजय पूर्वनिर्धारित होता आणि तो फातिमा बॉशच्या वडिलांच्या व्यावसायिक संबंधांमुळे होता.

Comments are closed.